spot_img
spot_img

लेखणीचा सन्मान : महेंद्रसिंग गिरासे यांना ‘पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025

 

सकारात्मक पत्रकारितेचा सन्मान : महेंद्रसिंग गिरासे यांची *“पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025” साठी उत्तर महाराष्ट्रातून निवड

प्रतिनिधी – भूषण पवार

शिंदखेडा :- पत्रकारिता ही समाजाचा आरसा मानली जाते. समाजातील प्रश्नांवर निर्भीडपणे प्रकाश टाकत सकारात्मक दृष्टीकोनातून सत्य मांडण्याचे कार्य करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान होणे ही अभिमानाची बाब आहे. शिंदखेडा तालुक्यातील सहकारी पत्रकार मित्र व साप्ताहिक बातमी वेध चे संपादक श्री. महेंद्रसिंग गिरासे (अलाणे ता. शिंदखेडा जि.धुळे) यांची व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघाच्या वतीने उत्तर महाराष्ट्रातून प्रतिष्ठेच्या “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025” साठी निवड करण्यात आली आहे.

सकारात्मक पत्रकारितेला प्रोत्साहन देण्यासाठी व्हॉईस ऑफ मीडिया तर्फे दरवर्षी *“पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड”* दिला जातो.यावर्षीचा हा सन्मान या विशेष पुरस्काराच्या स्वरूपात प्रदान करण्यात येणार आहे.
श्री.महेंद्रसिंग गिरासे हे आपल्या परखड,अभ्यासपूर्ण आणि निर्भीड लिखाणासाठी ओळखले जातात.सामाजिक प्रश्न, जनतेच्या अडचणी आणि विविध घडामोडींवर त्यांनी सातत्याने प्रभावी लेखन करत पत्रकारितेची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली आहे. त्यांच्या लेखणीमुळे अनेक सामाजिक विषयांना वाचा फुटली असून समाजात जागृती निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले आहे.

पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघाने त्यांची *“ पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”* साठी निवड करून त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. त्यांच्या या यशामुळे शिंदखेडा तालुका व धुळे जिल्ह्याच्या पत्रकारिता क्षेत्राचा सन्मान उंचावला आहे.

त्यांच्या या यशाबद्दल सहकारी पत्रकार मित्र, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

विशेष मार्गदर्शन व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघाचे
विभागीय अध्यक्ष मा.कल्पेश महाले या सह संयोजक मा.गोरक्षनाथ मदने
व शिंदखेडा तालुका अध्यक्ष प्रा.प्रदीपजी दीक्षित तसेच कार्याध्यक्ष मा.भालचंद्र पाटील,सचिव भूषण पवार यांचे लाभले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!