spot_img
spot_img

पिलखेड शिंदखेडा येथे मोफत सामुदायिक आरोग्य शिबीराचे आयोजन

प्रतिनीधी – भूषण पवार

शिंदखेडा येथे मोफत सामुदायिक आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. आरोग्य शिबीर महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष आणि गुरु गोरखनाथ आखाडा दक्षिणमुखी मारोती पिलखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने हनुमान जयंतीचे औचित्य साधुन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

शिंदखेडा:- आरोग्य शिबिर दि. 15 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10 वाजेला सुरु होऊन 4 वाजेपर्यत सदर आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबीर हे चिरणे कदाणे रस्त्यावरील गुरु गोरक्षनाथ आखाडा, दक्षिणमुखी मारोती मंदीर पिलखेडा येथे आयोजित केले असुन या ठिकाणी निरनिराळ्या विभाग करण्यात आले असुन प्रत्येक विभागात स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे प्रत्येक विभागात त्या त्या विभागाचे स्पेशल वैद्यकीय अधिकारी पुर्ण वेळ उपस्थित राहुन रुग्णांची तपासणी करणार आहे. शिबीरात तज्ञ डॉक्टर हे मुंबई व पुणे येथील प्रसिद्ध डॉक्टर पुर्ण वेळ उपस्थित राहणार आहे.

या शिबीराला महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री सहा. धर्मदाय रुग्णालय यांचे कक्ष प्रमुख रामेश्वरजी नाईक उपस्थित राहणार आहेत.

या आरोग्य शिबीराचे नियोजनावर वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांचे लक्ष असुन सदर शिबीर यशस्वी होण्यासाठी अधिका अधिक रुग्णांनी शिबीराचा लाभ घेण्यासाठी आशा वर्कर यांच्या माध्यमातून देखील रुग्णांना शिबीराबाबत माहीती पुरवली जात आहे. शहरापासुन शिबीराचे ठिकाण लांब असल्याने रुग्णांना शिबीराचा ठिकाणी जाणे येण्यासाठी वाहनांची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. शिबीरात जनरल मेडीसीन, जनरल सर्जरी, अस्थि विकार, बालरोगतज्ज्ञ, हृदय रोग तज्ञ, कान-नाक-घसा तज्ञ, नेत्र विकार तज्ञ, जनरल फिजीशियन, स्त्री रोग तज्ञ, आयुर्वेदिक तज्ञ, दंतरोग तज्ञ, होमिओपॅथी व आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला व उपचार उपस्थित राहुन तपासणी करणार आहे.

शिबिरात रुग्णांचा विविध चाचण्या देखील मोफत करण्यात येणार आहे यात मल्टी पेरो मॉनिटर, रक्तदाब तपासणी गुल्कोमीटरवर डायबेटीस तपासणी, ईसीजी तपासणी करण्यात येणार आहे तसेच व सर्व प्रकारच्या रक्त तपासणी करणार आहे.. आवशयकता असल्यास शिबीरानंतर रुग्णांची शस्त्रक्रिया देखील मोफत करण्यात येणार असुन शिंदखेडा परीसरातील रुग्णांनी या शिबीराचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन योगी दत्तानाथजी महाराज गुरु गोरक्षनाथ आखाडा दक्षिणमुखी मारोती पिलखेडा यांनी केले आहे.आज रोजी पत्रकार परिषदेत आयोजित करण्यात आली होती.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!