*महसूलमंत्र्यांच्या धडाडीच्या निर्णयांमुळेच शिवपाणंद चळवळीला मोठे यश*
मुंबई :- *महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यभरातील शेतकऱ्यांची मने जिंकली-शरद पवळे/दादासाहेब जंगले पाटील( महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळ)*
*दर्जेदार शासणनिर्णयासाठी चळवळीचा राज्य सरकारकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा*
ब्रिटीशकालीन शिव पाणंद शंतरस्त्यांसाठी महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे व महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळीचे राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांनी शेत तिथे रस्ता व गाव तिथे समृद्धी अभियानाच्या माध्यमातून राज्यभर जनजागृती करत राज्यव्यापी चळवळ उभी करून ग्राम प्रशासन,तालुका प्रशासन,जिल्हा प्रशासन, राज्यप्रशासन यांना निवेदन देत वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून राज्यातील शेतरस्त्यांच्या ज्वलंत प्रश्नासाठी सरकार प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करत राज्यात ऐतिहासिक लढा उभारला या लढ्याची राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दखल घेत चळवळीच्या पदाधिकाऱ्यांसोबत मंत्रालय मुंबई येथे संबंधित विभागाच्याअधिकाऱ्यांची बैठक घेवुन तातडीने राज्यात शेतरस्त्यांच्या संदर्भातीत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांमार्फत तातडीने कार्यवाही सुरु केली राज्यातील शेतरस्त्यांसाठी निशुल्क पोलिस संरक्षण,शेतरस्त्यांची अधिकृतपणे ७/१२ उताऱ्याच्या इतर हक्कात नोंद घेण्यासह इतर पोटहीस्याठी मोजणी शुल्क कमी (२०० रु.) करण्यात आले, आकारी पड म्हणून घोषीत झालेल्या जमिनी शेतकऱ्यांसह वारसांना चालु वर्षाच्या प्रचलित बाजार मुल्याच्या ५% शासणास जमा केल्यास शेतकऱ्यांना हस्तांतराचा अधिकार,डिजिटल भूमि अभिलेख आधुनिकीकरण ई-महाभूमि अंतर्गत संगणीकृत डिजीटल स्वाक्षरीने ७/१२,८-अ उपलब्ध होणार असे महत्वाचे निर्णय घेण्यात आल्यामुळे शिव पाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे व राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांनी राज्याचे कार्यसम्राट महसुलमंत्री चंदशेखर बावनकुळे यांची मुंबईत भेट घेवुन धन्यवाद व्यक्त करत सन्मान केला यावेळी राज्यात सरसकट शेतरस्त्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी चळवळीच्या मागणी प्रमाणे लवकरच शेतरस्त्यांना हद्द निश्चितीसाठी दगडी नंबरी लावणे,शेतरस्त्यांना नंबरींग करणे, राज्यातील तहसिलदारांना रोड मॉडेल तालुका पुरस्कार, तहसिल कार्यालयात रस्ता अदालत घेण्याच्या मागण्या शासन निर्णयात घेण्याचे आश्वासन महसुलमंत्र्यांनी चळवळीच्या पदाधिकाऱ्यांना दिले यावेळी महसुलचे मुख्य सचिव प्रवीण महाजन,महसुलचे राहुल गांगुर्डे आदी उपस्थित होते यावेळी विशेष कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांचे मोलाचे योगदान लाभले.