spot_img
spot_img

*मीराबाई गर्ल्स हायस्कूल येथे पहिला ʻविश्व ध्यान दिवसʼ संपन्न*

 

शिंदखेडा :- येथील मीराबाई गर्ल्स हायस्कूल येथे २१ डिसेंबर रोजी पहिला ʻ विश्व ध्यान दिवस ʼ संपन्न झाला. शाळेचे मुख्याध्यापक श्री. जे. पी. पाटील यांनी सांगितले, की ६ डिसेंबर २०२४ रोजी संयुक्त राष्ट्र सभेमध्ये ʻ भारत, मेक्सिको, नेपाळ, श्रीलंका, अंडोरा, लिंकटेंस्टाईन ʼ या देशांनी प्रस्ताव दाखल केला. त्या प्रस्तावाला १९३ देशांनी समर्थन दिले.
संयुक्त राष्ट्र सभेने जगभरात २१ डिसेंबर रोजी ʻ विश्व ध्यान दिवस ʼ साजरा करण्याचे ठरवले. ʻ Inner peace global harmony ʼ ही या वर्षाची मध्यवर्ती कल्पना आहे.
ʻ Father of Meditation ʼ म्हणून परमहंस योगानंद यांना ओळखले जाते. ध्यान करताना मन एकाग्र करणे महत्त्वाचे असते. भारतातील अनेक ऋषी, संत, गौतम बुद्ध, स्वामी विवेकानंद, श्री श्री रविशंकर यांनी ध्यानधारणा केली. समाधी ही ध्यान धारणेची अंतिम पायरी असते. ध्यान म्हणजे ʻ एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रीत करणे, जागरूकता वाढवणे, मानसिक व भावनिकदृष्ट्या मन शांत व स्थिर करणे होय. ʼ असे मार्गदर्शन करताना मुख्याध्यापक श्री. जे. पी. पाटील यांनी सांगितले.
योग शिक्षिका श्रीमती एम. जी. पाटील यांनी सांगितले, की डोळे बंद करून श्वास घेणे व श्वास सोडणे या क्रियेने शरीराच्या प्रत्येक अवयवावर, पायाच्या अंगठ्यापासून सुरूवात करून डोक्यापर्यंत श्वास आणता येतो तसेच ध्यानाचे ९ प्रकार व महत्त्व यांची माहिती देवून सर्व विद्यार्थिनीनींकडून व शिक्षकांकडून २० मिनीटे प्रात्यक्षिकांसह ध्यान करून घेतले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!