17.9 C
New York
Friday, September 13, 2024

Buy now

बुध्दी देवता गणरायाची जनता हायस्कूलात उत्साहात स्थापना.*

  • *बुध्दी देवता गणरायाची जनता हायस्कूलात उत्साहात स्थापना.*

प्रतिनीधी – भूषण पवार

शिंदखेडा : – येथील जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात आराध्य दैवत व बुद्धी देवता श्री गणरायाची उत्साहात स्थापना करण्यात आली.
सदर कार्यक्रम प्रसंगी दादासो श्री गौरव मनोहर पाटील यांच्या हस्ते सहपत्निक विधिवत गजाननाची पूजा करून स्थापना करण्यात आली.
याप्रसंगी अध्यक्ष श्री मनोहर गोरख पाटील उपाध्यक्ष श्री अमजद मेहमूद कुरेशी,खजिनदार श्री देवेंद्र पोपटराव बोरसे,सचिव श्रीमती मीराताई मनोहर पाटील संचालक प्रा श्री जितेंद्र गोरख पाटील प्राचार्य श्रीमती एस एस बैसाणे पर्यवेक्षक श्री उमेश देसले ज्येष्ठ लिपिक श्री किशोर गोरख पाटील उत्सव अध्यक्ष श्री बी एन मोरे, श्री एस के जाधव श्री बी जे पाटील श्री डी एच सोनवणे तसेच शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी,व विद्यार्थी उपस्थित होते.
शाळेतील हा गणेश उत्सव सात दिवसाचा असणार आहे.
या सात दिवसीय गणेशोत्सवात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हावा व त्यांच्या बुद्धिमत्तेला चालना मिळावी म्हणून विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. यात वकृत्व स्पर्धा,निबंध स्पर्धा,देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा,शालेय क्रीडा स्पर्धा अशा कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे .तसेच काही व्याख्यात्यांच्या व्याख्यानांचे देखील आयोजन करण्यात आले आहे. शाळेतील या उत्साहाचे दुसरे वर्ष असल्याकारणाने विद्यार्थ्यां यातअत्यंत उत्साहाने सहभागी झाले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!