राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष अंतरसिंग आर्य धुळे जिल्हा दौऱ्यावर
आदिवासी सेवा, संस्था संघटनांनी परिषदेस उपस्थित राहण्याचे आवाहन
संपादकीय,,,,,,,,
धुळे : – राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष अंतरसिंग आर्य हे दिनांक 10 व 11 सप्टेंबर, 2024 या दोन दिवसीय धुळे जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. श्री.अंतरसिंग आर्य यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार, 10 सप्टेंबर, 2024 रोजी दुपारी 2.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, (नियोजन सभागृह) धुळे येथे वन रक्षा समिती, वन अधिकार हितग्राही तथा पेसा समिती सोबत परिषद आयोजित आयोजित केली आहे.तरी या परिषदेस जिल्ह्यातील आदिवासी समाज बांधव, आदिवासी सेवा, संस्था यांनी आपल्या समस्यांच्या निराकरणासाठी उपस्थित रहावे असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकासचे प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.