16.4 C
New York
Friday, September 13, 2024

Buy now

मीराबाई गर्ल्स हायस्कूलमध्ये ʻ शिक्षक दिन व सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन ʼ उत्साहात साजरा*

  • *मीराबाई गर्ल्स हायस्कूलमध्ये ʻ शिक्षक दिन व सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन ʼ उत्साहात साजरा*

शिंदखेडा : – दिनांक ५ सप्टेंबर रोजी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस संपूर्ण भारतभर ʻ शिक्षक दिन ʼ म्हणून साजरा केला जातो. शिंदखेडा येथील मीराबाई गर्ल्स हायस्कूलमध्ये शिक्षक दिन ʻ स्वयंशासन दिन ʼ म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष स्वप्नील देसले यांनी शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुख्याध्यापक जे. पी. पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव केला.
याप्रसंगी ज्येष्ठ शिक्षक ए. बी. वारूडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पर्यवेक्षक व्ही. आर. महाले यांनी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची प्रबोधनपर माहिती मोबाईलवर ऐकवली.
आजच्या दिवशी मुख्याध्यापकांची भूमिका कु. वेदिका चौधरी तर पर्यवेक्षकांची भूमिका कु. संस्कृती चौधरी या दहावीच्या विद्यार्थिनींनी पार पाडली. शिक्षक दिनाच्या दिवशी एक वेगळा अनुभव विद्यार्थिनींना दिला जातो. अगदी तसाच अनुभव गर्ल्स हायस्कूलमधील दहावीच्या विद्यार्थिनींना देखील देण्यात आला. दहावीच्या विद्यार्थिनींनी त्यांच्यापेक्षा लहान असलेल्या पाचवी ते नववीच्या विद्यार्थिनींना अध्यापन केले. शाळेतील विद्यार्थिनींनी शिक्षकांची सर्व कामे वाटून घेतली. या दिवशी सर्व शाळा विद्यार्थिनी शिक्षिकांनी चालवली. शिकवणाऱ्या विद्यार्थिनी शिक्षिकांसाठी व शिकणाऱ्या इतर विद्यार्थिनींसाठी हा एक वेगळा अनुभव होता. सकाळी साडे अकरा ते दुपारी अडीच वाजेपर्यंत या विद्यार्थिनी शिक्षिकांनी अध्यापन केले.
याप्रसंगी शिक्षकांप्रति कृतज्ञता व्यक्त करत सर्व शिक्षकांचा गुलाबपुष्प व पेन देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. प्रगती तायडे व कु. अश्विनी गिरासे या विद्यार्थिनींनी केले. एक दिवसासाठी शिक्षिका बनलेल्या विद्यार्थिनींनी आजचा ʻ शिक्षक दिन ʼ आमच्यासाठी कसा मजेशीर होता, याविषयी आपले अनुभव व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात ए. बी. वारूडे म्हणाले की, ʻʻ आदर करणारी व्यक्ती प्रामाणिक असते. शिक्षणाने वर्तनात परिवर्तन होत असते. म्हणून खूप शिका व मोठे व्हा.ʼʼ असे विचार व्यक्त करून एक दिवसासाठी शिक्षिका बनलेल्या विद्यार्थिनींचे कौतुक केले.
मुख्याध्यापक श्री. जे. पी. पाटील, व्ही. आर. वाघ सर, संजना जाधव, भूमी परदेशी, वैष्णवी चौधरी, सिद्धी संधानशिव, रिता ठाकूर यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. प्रगती तायडे व अश्विनी गिरासे यांनी केले. सत्कार समारंभाचे सूत्रसंचालन भूमी परदेशी, संजना जाधव यांनी केले. लक्षणा चौधरी, लतिका भोई यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दहावीचे वर्गशिक्षक के. एस. परदेशी, सी. एस. पाटील, व्ही. आर. वाघ यांनी परिश्रम घेतले. अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात शिक्षक दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!