19.7 C
New York
Friday, September 13, 2024

Buy now

एम.एच.एस.एस.हायस्कूलमध्ये शिक्षक दिन साजरा*

 

*एम.एच.एस.एस.हायस्कूलमध्ये शिक्षक दिन साजरा

शिंदखेडा :-  दि. ५ सप्टेंबर रोजी एम एच एस एस हायस्कूल शिंदखेडा येथे शिक्षक दिन *स्वयं शिस्त दिन* म्हणून साजरा करण्यात आला. याप्रसंगी इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांनी शाळेचे कामकाज सांभाळले. विद्यार्थी मुख्याध्यापक म्हणून वेदांत पाटील याने काम सांभाळले. आज सर्व कामकाज विद्यार्थ्यांनी सांभाळले. शेवटी चक्रधर स्वामी जयंती व डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती निमित्त कार्यक्रम घेण्यात आला त्याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थी मुख्याध्यापक वेदांत पाटील याने आलेले अनुभव सांगितले. श्री व्ही टी चौधरी, श्री दिपक देशमुख शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्री आर पी चौधरी सर यांनी विद्यार्थ्यांना शिक्षक दिनाची महत्त्व प्रतिपादित केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक श्री टी एन पाटील सर यांनी श्री चक्रधर स्वामी यांचा विषयी माहिती सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज सुतार यांने केले तर आभार प्रदर्शन सोपान मराठे याने केले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक बंधू उपस्थित होते

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!