*राज्यातील संगणकपरिचालकांच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संगणक परिचालक करणार अनोखे आंदोलन !
*२० ऑगस्टला ई-मेल तर २१ ऑगस्ट ला ट्विट मोर्चा करून संगणकपरिचालक वेदना व व्यथा शासनाकडे मांडणार !*
मुंबई :- मागील १२ वर्षापासून ग्रामपंचायत स्तरावर काम करणार्या संगणकपरिचालकांना कर्मचारी दर्जा व किमान वेतन देणे या प्रमुख मागणीसाठी येत्या २६ ऑगस्ट रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर आक्रोश धरणे आंदोलन करण्यात येणार आहे,परंतु तत्पूर्वी शासनाचे लक्ष डिजिटल माध्यमातून वेधण्यासाठी २० ऑगस्टला ई-मेल तर २१ ऑगस्ट ला ट्विट मोर्चा करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटनेचे अध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी सांगितले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त की,मागील १२ वर्षापासून ग्रामपंचायतचे संगणकपरिचालक प्रामाणिकपणे काम करत असून संगणकपरिचालकांना ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन देऊन न्याय देण्याची मागणी असताना या मागणीकडे राज्य शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे,वेगवेगळ्या कंपन्या पोसण्याचे काम शासन करत असून या कंपन्यांनी कोट्यवधी रूपयांचा भ्रष्टाचार केलेला असताना परत त्याच कंपन्यांना काम देण्याच्या उद्देशाने शासन संगणकपरिचालकांच्या आयुष्या सोबत व भविष्या सोबत खेळत आहे,त्यात ०१ जुलै पासून तर संगणकपरिचालकांना कुणाकडून नियुक्ती दिली गेली नाही,त्यामुळे संगणकपरिचालक व्यथित झालेले असून त्यांच्या मनात असंतोष निर्माण झाला असून त्यामुळे २६ ऑगस्ट ला आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन करण्यात येणार असून तत्पूर्वी राज्यातील सर्व संगणकपरिचालक डिजिटल व ऑनलाईन कामकाज करणारा एक महत्वाचा घटक असल्याने २० ऑगस्ट रोजी देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी साहेबांच्या connect@my.nic.in,राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या cm@maharashtra.gov.in,उपमुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या dcm@maharashtra.gov.in उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार साहेबांच्या Maharashtra.dcm@gmail.com ग्रामविकासमंत्री मा.गिरीशजी महाजन साहेबांच्या minrdd@maharashtra.gov.in, राज्याचे मा.मुख्य सचिव मॅडम यांच्या sec.mh@gov.in , ग्रामविकास विभागाचे मा.प्रधान सचिव साहेबांच्या sec.rdd@maharahtra.gov.in व ग्रामविकास विभागाच्या sosan.rdd-mh@nic.in या सर्व ईमेलवर राज्यातील प्रत्येक संगणकपरिचालक आपली मागणी व प्रश्न मांडणार आहेत,त्याच बरोबर २१ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १०.०० पासुन पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी साहेब,राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथरावजी शिंदे साहेब,उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब,उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार साहेब व ग्रामविकासमंत्री मा.गिरीशजी महाजन साहेब या सर्व मान्यवरांच्या अधिकृत ट्विटवरच्या अकाऊंटला मेन्शन करून आपला प्रश्न राज्यातील सर्व संगणकपरिचाल्क शासनासमोर मांडण्यात असल्याचे संघटनेचे राज्यअध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी बोलताना सांगितले आहे.