- *शिंदखेडा तालुक्यातील रेशन दुकानदारांनी ई-पॉस मशीनची अंत्ययात्रा काढून तहसीलदारांना केले ई-पॉस मशीन परत*
शिंदखेडा प्रतिनिधी- भूषण पवार
शिंदखेडा :- वारंवार येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे शिंदखेडा तालुक्यातील रेशन दुकानदारांनी 5 ऑगस्ट रोजी आंदोलन करून ई-पॉस मशीन तहसील कार्यालयात जमा केल्या. रेशन दुकानदार संघटनेने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,शासनामार्फत नव्याने देण्यात आलेल्या 4G ई-पॉस मशिन स्लो असल्याने या मशिनवर धान्य वितरण करताना मागील एक महिन्यापासून सर्वर डाऊन असल्यामुळे धान्य वितरण करण्यास अडथळे येत असुन,मशिन अजिबात सुव्यवस्थित चालत नाहीत.याबाबत आपणास दि.१९/०७/२०२४ लेखी निवेदनाव्दारे कळविले होते.अद्याप पर्यंत मशिन काही सुस्थितीत सुरु झाले नाही त्यामुळे दैनंदिन धान्य वितरण प्रलंबित राहत आहे, आणि स्वस्त धान्य दुकानदार व कार्ड धारक (ग्राहक) यांच्यात दररोज वाद निर्माण होत असुन खुप मनस्ताप वाढत आहे.या सर्व समस्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारक महासंघ लि. आज दि. ०५/०८/२०२४ आपल्याकडे धान्य वितरणाचे ई-पॉस मशिन स्वाधिन करीत आहोत. यापुढे सुरळीत दैनंदिन धान्य वितरणासाठी सर्वरची यशस्वी प्रक्रिया पूर्ण करावी जेणेकरून सर्वर सुस्थितीत चालून धान्य वितरण करणे शक्य होईल,जेणेकरून सर्वर सुरळीत झाल्यावर आम्ही ऑनलाईन धान्य वाटप सुरळीत करू शकतो. सदर निवेदन नायब तहसीलदार श्रीमती शारदा बागले यांनी स्वीकारले.
4G प्रणाली असूनही या मशीनचा सर्व्हर नेहमीच बंद असतो.त्यामुळे अनेकवेळा धान्याचे वितरण तासनतास थांबवावे लागत असल्याने ग्राहकांना वारंवार दुकानाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना 2G काय आणि 4G काय हेच समजत नाही आणि रेशन दुकानदार त्यांना जाणीवपूर्वक त्रास देत असल्याचा त्यांचा गैरसमज आहे.त्यामुळे अनेकवेळा कार्डधारक आणि रेशन दुकानदार यांच्यात वाद होतात.त्यामुळे दुकानदाराची प्रतिमा मलीन होत आहे.यासाठी तालुक्यातील दुकानदारांनी 05 ऑगस्ट रोजी सर्व मशिन तहसीलदार कार्यालयात परत करण्याच्या निर्णयानुसार आज सकाळी शिंदखेडा तहसील कार्यालयासमोर ई-पॉस मशीनची अंत्ययात्रा काढून आंदोलन करून जमा केली.या आंदोलनात रेशन संघटनेचे धुळे जिल्हाउपाध्यक्ष भाईदास तुळशीराम पाटील शिंदखेडा तालुकाध्यक्ष आर आर पाटील,उपाध्यक्ष तुषार पाटील, जिल्हा सचिव सुधाकर एन पाटील, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र सिंग राजपूत, कार्यकारणी सदस्य न्हान भाऊ पाटोळे, जिल्हा सहाय्यक विजय पाटील सचिव सुरेश कुंभार व स्वस्त धान्य दुकानदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.