-1.6 C
New York
Thursday, January 16, 2025

Buy now

spot_img

नरडाणा पोलिसांची साहसी कामगिरी,,,,,

नरडाणा पोलीस स्टेशन चे पोलीस कॉन्स्टेबल विनोद कोळी यांनी  स्वतः हा तलावातून काढला मृतदेह.

  1. नरडाणा :- सविस्तर बातमी अशी की, नरडाणा पोलीस स्टेशन येथे शिराळे गावाचे पोलीस पाटील तुषार पाटील यांनी माहिती दिली की, शिराळे गावाच्या नजीक असलेल्या तलावात एका इसमाचा मुत देह तरंगत आहे. अशी माहिती मिळाल्या वर डायल 112 वर कार्यरत असलेले पो. ना./54 बी. आय.पाटील व पो.कॉ./ 994 विनोद कोळी हे घटना स्थळी पोहचले सदरचा मृत देह शिराळे गावाच्या नजीक तलावात अवघड अशा ठिकाणी होता तिथे उतरणे ही अवघड होते तलाव साधारणतः 40 फूट खोल होता अशा वेळी तात्काळ पोलीस कॉन्स्टेबल विनोद कोळी व शिराळे गावातील विठ्ठल पाटील हे तलावात दोराच्या साहाय्याने उतरून बेशुद्ध अवस्थेत असलेल्या इसमाचे देह पोलीस पाटील गव्हाणे, पोलीस पाटील शिराळे यांच्या मदतीने बाहेर काढून नरडाणा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नेले तेथील डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले सदरचा मृत देह हा सतिष साहेब राव पवार वय -44 रा. दत्ताने ता. शिंदखेडा जि. धुळे. असे समजले पुढील तपास – पो. ना./54 पाटील हे करीत आहेत…

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!