*कामराज निकममुळे नाराज असलेले 5 हजार मतांचा भाजपाला लाभ होणार – तालुकाध्यक्ष दिपक बागल*
शिंदखेडा :- कामराज निकम यांचे वागणे कार्यकर्त्यांशी अतिशय उध्दटपणे होते, जिल्हा परीषदेचे उपाध्यक्ष पद त्यांना दिल्यानंतर त्यांच्याकडून तालुक्याच्या विकासाची अपेक्षा होती पंरतू त्यांनी कोणत्याही कार्यकर्त्याला साधे 1 लाखाचे काम न देता स्वत:ची मुले, पुतण्या, सगेसोयरे यांनाच कामे दिली गेली स्वत:चा एवढा विकास केला की, रावल साहेबांच्या संस्थेत कारकून असलेल्या व्यक्तीकडे जवळपास 100 कोटीची अमाप संपत्ती जमा झाली त्यांच्या घरातील प्रत्येक व्यक्तीकडे चार चाकी गाडया आहेत, त्यांच्याकडे 8 ते 10 हायवा गाडया, पोकलँन्ड मशिन, 4 ते 5 जेसीबी मशिन, एवढेच नव्हे तर आजही त्यांच्याकडे करोडोची माया कशी जमली याचे उत्तर त्यांनी दयावे तालुक्यातील आमच्या निष्ठावान कार्यकर्त्यांवर कामराज निकम सातत्याने अन्याय करीत असल्याने दुरावलेले जवळपास 5000 हजार मतांचा लाभ भाजपाला होणार आहे, नाराज लोकांनी आमच्याशी संपर्क साधण्यास सुरवात केली असून कामराज निकम गेल्यामुळे आ.रावल साहेबांना 5 हजार मतांचा लाभ होणार आहे, मतदारसंघात विकास झाला नसता तर तालुक्यातील जनतेने सलग 4 वेळा निवडून देण्यासोबतच तालुक्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजपाचा एकतर्फी विजय झालेला आहे, कामराज निकम यांच्याकडे जिल्हा परीषदेच्या माध्यमातून केलेल्या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून कमविलेला पैसा जास्त झाल्याने त्यांना विधानसभेचे वेध लागले असून जर पैशांवर निवडणुक जिंकण्याचा कामराज निकम यांचा माज जनता नक्कीच उतरवेल मतदारसंघातून भाजपाचा कुणीही कार्यकर्ता निकम सोबत जात नसल्यामुळे त्यांची पंचाईत झाली असून याउलट कामराज निकममुळे दुरावलेली मंडळी आता आमच्यासोबत भक्कमपणे येत असल्याने आमचा 5 हजार मतांचा लाभ होणार असल्याची प्रतिक्रिया भाजपाचे तालुकाध्यक्ष दिपक बागल यांनी दिली आहे.
*आमदारकी सोडा, आधी विखरण गटात राजीनामा देवून निवडून दाखवा*
कामराज निकम यांच्या नशिबात एवढाच राजयोग होता कारण भाजपाने कामराज निकमला काय दिले नाही तरीही केवळ पैशांच्या लालसेपोटी त्यांनी ज्यांच्या जीवावर मोठे त्यांच्या पाठीत वार करण्याचा जो निर्णय घेतला त्यामुळे त्यांना यापुढे आमदारकी तर सोडा पंचायत समितीला देखील ते निवडू शकत नाही , त्यांना आमचे आव्हान आहे की, आमदारकीची निवडणुक लढण्याची त्यांची लायकी नाही आधी त्यांनी विखरण गटातून आमच्या जीवावर निवडून गेलेले आहेत त्या पदाचा राजीनामा देवून तेथून पुन्हा निवडून दाखवावे, ज्यांना 32 वर्ष एवढे मोठे केले त्या नेत्याला कामराज निकम दगा देवू शकतात तर ते जनतेचे कुठे होणार आहेत त्यामुळे त्यांनी आधी भाजपाकडून मिळालेले जिल्हा परीषदेचे सदस्यपदाचा राजीनामा देवून निवडून दाखवावे असे आव्हान भाजपाचे तालुकाध्यक्ष दिपक बागल यांनी दिले आहे,