जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दोंडाईचा न्यायालयात वृक्षारोपण
दोंडाईचा : – दि. 5 जून रोजी दोंडाईचा विधी सेवा समिती, वकील संघ दोंडाईचा व वन विभाग दोंडाईचा यांच्या संयुक्त विद्यमाने न्यायालय परिसरात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षरोपण दोंडाईचा न्यायालयाचे न्यायाधीश आदित्य नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी वन अधिकारी व्ही.टी.पदमोर , वकील संघाचे अध्यक्ष जे.व्ही.तायडे,विशेष सरकारी वकील आनंद कुलकर्णी ,ऍड एन.पी.अयाचित, ऍड एम.जी.शाह, पी.एस.मराठे, ऍड एस.बी. भोई, ए. डी. पाटील, ए.आर.माळी, ऍड एस. पी. वाडीले, सहाय्यक अधीक्षक श्रीमती बी.एन. बागल उपस्थित होते.
दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर होणारी झाडांची कत्तल याचा परिणाम तापमानावर होतांना दिसून येत आहे. उन्हाची तीव्रता प्रचंड प्रमाणात वाढली असून या वर्षी तापमान 45 डिग्री पर्यंत वाढले आहे. भविष्यात तापमान यापेक्षा ही पुढे जाऊ शकते म्हणून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून संवर्धन करणे गरजेचे झाले आहे. असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
यावेळी न्यायालयीन कर्मचारी एच. सी. भांडारकर, डी. वाय. कोळी, एन जे मोहिते, ई आर शेख, एस एस सापोळे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी वन कर्मचारी व न्यायालयीन कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.