बोर्डाच्या परीक्षेत भाजी विक्रेत्याची मुलगी ठरली अव्वल, मिळवले ९७.४० % गुण : IAS अधिकारी होण्याची इच्छा
शिंदखेडा: धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा शहरातील भाजी विक्रेत्याची मुलगी हर्षदा प्रकाश चौधरी हिने एस एस सी परीक्षेत ५०० पैकी ४८७ गुण मिळवून ९७.४० % घेत तीनही केंद्रात अव्वल स्थान पटकावलं आहे. हर्षदा प्रकाश चौधरी ही व्ही के पाटील इंटरनॅशनल स्कूल या शाळेची विद्यार्थिनी आहे. आपल्याला आयएएस अधिकारी होण्याची इच्छा असल्याचं हर्षदा चौधरी हिने सांगितलं आहे.
माझ्या कामगिरीमुळे मी फारच उत्साही आहे. मी कधीही जास्त किंवा रात्री जागून अभ्यास केलेला नाही. मी माझ्या ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे अभ्यास करायची. यामुळे मला भितीवर मात करता आली.
हर्षदाचे शिक्षक मनोज पाटील यांनी ती फार हुशार विद्यार्थनी असून गणित , सामाजिक शास्त्र या विषयांत तिची मजबूत पकड असल्याचं सांगितलं आहे. ती नियमितपणे वकृत्व आणि प्रश्नमंजुषा स्पर्धेत भाग घेत असे. तिने अनेक वकृत्व स्पर्धेतही पहिलं पारितोषिकही पटकावलेले आहेत. रनींग, कबड्डी, अथलेटिक्स मध्ये राज्यस्तरावर मजल मारली आहे.
हर्षदा नर्सरी पासून आमची विद्यार्थिनी आहे. तिला घडामोडींबद्दल नेहमी माहिती असतो. तिचा बुद्ध्यांक फार चांगला आहे.ती गोष्टी लगेच आत्मसात करतो. मोकळ्या वेळेत ती इंटरनेटवर माहिती शोधत असते. नवीन माहिती मिळवण्यासाठी ती नेहमीच उत्सुक असते असे माजी प्राचार्य लाईशराम धनन्जॉय सिंघा व प्राचार्या डॉ आरती जाधव यांनी सांगितले.
तिने आपले शिक्षक असणारे आई-वडील यांना यशाचं श्रेय दिलं आहे.
मला पुढे इजिनियरिंग करून आय ए एस व्हायचं आहे.माझे आदर्श आय ए एस सृष्टी जयंत देशमुख या आहेत.- हर्षदा चौधरी.