✍️✍️🚥🚥✍️✍️
ग्रामीण व्यवसायामुळे स्थलांतराचे प्रमाण होतेय कमी !
भारत विविधतेने नटलेला,
शिंदखेडा :- सजलेला देश आहे आणि गावखेडे त्याचा आत्मा, गावखेड्यांच्या उत्थानासाठी ग्रामसमिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुढे सरसावला आहे. त्यांच्याच पुढाकाराने शिंदखेडा तालुक्यातील अक्कलकोस या आदिवासीबहुल गावात रंग निर्मितीचे काम होत असून यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी गावातच उपलब्ध झाल्या. त्यामुळे रोजगारासाठी होत असलेले स्थलांतर रोखले गेले आहे. येथे निर्मित नैसर्गिक रंगांना मोठी मागणी आहे.
शिंदखेडा तालुक्यातील दुर्गम भागातील उंचसखल टेकडीवर अक्कलकोस गाव वसलेले आहे. गावाची लोकसंख्या ९३४ व कुटुंब संख्या १३४ असून शंभर टक्के आदिवासी लोकवस्तीचे हे गाव आहे. येथे शिंदखेडा तालुक्यातील तीन आश्रम शाळेपैकी एक शासकीय आश्रमशाळा आहे मात्र या शाळेत धडगाव, तोरणमाळ तसेच अन्य परिसरातून विद्यार्थी येऊन शिक्षण घेतात. गावातील कुटुंब हंगामी मोलमजुरीसाठी स्थलांतरित होत असल्याने त्यांची मुले सोबत असतात. यामुळे गावाच्या समस्या, अडचणी व यावर उपाय काय आहेत याचा परिपूर्ण अभ्यास दोंडाईचा स्थित भीमराज बहुउद्देशीय संस्थेने केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुढाकाराने ग्रामविकास विभागाने पुढाकाराने गत 5 वर्षांपासून येथे पर्यावरणपूरक नैसर्गिक रंगाची निर्मिती करण्याचे काम सुरू आहे
यातून गावात रोजगाराच्या संधी
नैसर्गिक रंगाची निर्मिती करतांना अक्कलकोस येथील ग्रामसमितीच्या महिलाना गावातच रोजगार उपलब्ध झाला, स्थानिकांच्या हाताला काम मिळत आहे. शिवाय स्वतः विक्री करत असल्याने ग्राहक व उत्पादक यांच्यातला इतर घटक दुकानदार बाजूला होऊन दोन पैसे जादा मिळत आहेत, गावातच रोजगार मिळत असल्याने बाहेरील स्थलांतरचे प्रमाण दिवसागनिक होतेयं. अक्कलकोसकर महिला सक्षमीकरण दृष्टीने’ एक पाऊल पुढे येत आहेत,
गावातील नागरिक श्रमदानातून गावाला जलयुक्त करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
जलव्यवस्थापन साठी देखील पुढाकार
गावाला पाणीदार गाव बनविण्यासाठी भीमराज बहुउद्देशीय संस्थेने पुढाकार घेतला आहे
पाच ते सात किलोमीटरपर्यंत पाण्याचा जमिनीतील जलस्रोत वाढून शेतशिवारातील विहिरी जलयुक्त बनणार आहेत. यासाठी भीमराज बहुउद्देशीय संस्थेचे सहकार्य व सेवावर्धिनी पुणे तसेच महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड आर्थिक सहकार्य मोलाचे ठरत आहे.