20.8 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

जि.प शाळा भडणे वनराई वाचवण्यासाठी शिक्षकांची धडपड,,,,

भाडोत्री टँकरने पाणी आणून वाचवली जातेय शाळेची बाग…

भडणे ;- जि.प.शाळा भडणे ता.शिंदखेडा येथे नैसर्गिक पाणी टंचाई ची दाहकता अतिशय तीव्र झाली आहे.परिसरात व तालुक्यात पाणी पातळी प्रचंड खालावली आहे.त्याचा परिणाम जिल्हा परिषद शाळेतील वृक्ष संगोपण व शालेय बाग बगीचा यावर देखील झाला आहे.शाळेतील पाचशे फूट खोल दोन बोअरवेल्स पूर्णतः कोरडी झाली आहे.शाळेतील विविध प्रकारची फुलझाडे, लावुन व त्यांचे संगोपनही शिक्षक करीत होते मात्र शाळेतील बोरवेल्स आटल्यामुळे भरलेली वुश्य पाण्याअभावी कोरडी पडत होती लहान मुलाप्रमाणे यावर्षींना येथील शिक्षकांनी त्यांचे संगोपन करून जगवली होतीभडणेजि प शाळा एक निसर्ग रम्य वातावरणात दिसून येत होती डिडोनिया,सदर परिस्थिती वर उपाययोजना म्हणून जिल्हा परिषद भडणे शाळेत मुख्याध्यापक निसर्ग मित्र रविंद्र बोरसे व सहशिक्षक माधवराव पाटील,सीमा चव्हाण यांनी स्वखर्चाने टँकर द्वारे विकत चे पाणी आणून शाळेची वनराई वाचवण्याची धडपड सुरु केली आहे.त्यांना स्वयंपाकीन ताई लता बोरसे व रेखा बोरसे यांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे.
ज्या दिवसापासून शाळेवर रुजू झालो आहे ग्रामपंचायत ने बोरवेल व पाणी मोटर बसून दिली होती यामुळे आम्ही शाळेवर निसर्गरम्य वातावरण निर्मितीसाठी वृक्ष लागून जगवली मात्र बोरवेल अआटल्यामुळे स्वखर्चाने पाणी टकर आणुन जगवत आहे यामुळे खर्च होत असला तरी मनाला एक समाधान वाटत आहे
रवींद्र बोरसे मुख्याध्यापक भडणे शाळा,,

सुरुवातीला शाळेवर रुजू झाले तेव्हा शाळा ओसाड व शाळेत आवारातएकही वुक्ष नव्हता दोघं शिक्षकांनी मेहनत घेऊन लोकांच्या सहकार्यातून वुक्ष लागवड केली मात्र वुक्ष जगवण्यासाठी स्वखर्चाने टकरने पाणी घालत आहे त्यामुळे मणाला समाधान वाटते
माधवराव पाटील जि.प.शिक्षक भडणे,,,,

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!