शिरपूर महाराणा प्रताप पुर्व प्राथमिक शाळेत महाराणा प्रताप पुण्यतिथी निमित्त अभिवादन
शिरपूर : येथील महाराणा प्रताप क्षत्रिय राजपूत समाज संस्था संचलित, महाराणा प्रताप पुर्व प्राथमिक शाळा, प्रेम कमल नगर शिरपूर येथे महाराणा प्रतापसिंह यांच्या 429 व्या पुण्यतिथी दिना निमित्त प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
भारतातील महान योद्धा शूरवीर महाराणा प्रतापसिंह यांचा जन्म 9 मे 1540 रोजी कुंभलगड (राजस्थान) येथे झाला. हल्दीघाटीच्या लढाईत अकबराच्या सैन्याला नेस्तनाबूत केल्यानंतर 19 जानेवारी 1597 मध्ये चावंड येथे जगाचा निरोप घेतला.
शिरपूर महाराणा प्रताप क्षत्रिय राजपूत समाज संस्थेचे अध्यक्ष संग्रामसिंग राजपूत व उपाध्यक्ष योगेंद्रसिंग सिसोदिया यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. बी डी सिसोदिया सर, शिक्षिका योगिता राजपालसिंग चौधरी, कविता संदीप राजपूत उपस्थित होते.







