वडाळी जि.प गटात स्थानिक उमेदवाराला पक्ष न्याय देईल का ??
वडाळी :- तालुक्यातील वडाळी जिल्हा परिषद गटात निवडणूकीसाठी ईच्छुक असलेले युवा उद्योजक रविंद्र राजपूत यांनी नागरीकांच्या भेटी घेत जनसंपर्कावर भर दिला आहे.आपल्या गटातील प्रत्येक गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटीबद्ध आहोत. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या वडाळी गटात निवडणूक लढविण्यासाठी प्रसिद्ध युवा उद्योजक रवीशेठ राजपूत यांनी आपली तयारी दर्शवली आहे. निवडणूकीसाठी इच्छुक असल्याने रविंद्र राजपूत यांनी आतापासून जनसपर्कावर भर देत कंबर कसली आहे. वडाळी गटातील प्रत्येक गावांमध्ये जावून नागरीकांच्या भेटीगाठी घेत आहेत.शहादा तालुक्यातील वडाळी,टेंभे या गावातील गोरगरीबांच्या वस्तीत जावून रवीशेठ राजपूत यांनी नागरीकांच्या समस्या जाणून घेतल्या. शासकिय योजनांच्या लाभांपासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांना लाभ देण्याबाबत आश्वासन दिले. तसेच विकासाबाबत नागरीकांशी संवाद साधत विकास करण्याचे आश्वासन दिले. या भेटीगाठीतून वडाळी गटातील नागरीकांकडून इच्छुक उमेदवार रवि राजपूत यांना चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे.वडाळी गटासह प्रत्येक गावांचा विकास करण्यासाठी आपण नेहमी कटीबद्ध राहू असे आश्वासन रवि राजपूत हे देत आहेत. जनसंपर्क वाढवित त्यांनी आतापासूनच प्रचाराच्या रणनितीला सुरुवात केली आहे. आपल्या गटातील गावागावात जावून दररोज मतदारांच्या भेटीगाठी घेवून आपूलकीने समस्या व अडचणींची माहिती जाणून घेत आहेत. या जनसंपर्कातून रविशेठ राजपूत यांना प्रचंड प्रतिसाद सर्वसामान्य नागरीकांकडून मिळत आहे. वडाळी जि.प.गटात रविंद्र राजपूत हे निवडणूक लढविणार असल्याने त्यासाठी त्यांनी तयारीही परीपूर्ण
केली आहे.भ्रष्टाचार मुक्त विकास कामांना प्राधान्य देण्यात येईल आणि स्थानिक नागरीकांच्या समस्या सोडविण्यात येतील.
अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.








