*केदारेश्वर मंदिर शिंदखेडा येथे भव्य पालखी सोहळा व महाप्रसादासह कीर्तनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा…!*
*श्री.जतीन बोरसे यांना मिळाला पालखीच्या आरतीचा मान..!!*
शिंदखेडा :- शहरातील आदर्श कॉलनी परिसरातील सुप्रसिद्ध केदारेश्वर मंदिर येथे दरवर्षी महाशिवरात्री निमित्त शिंदखेडा शहरातील तसेच कॉलनी परिसरातील सर्व शिवभक्तांसाठी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला जात असतो त्याचप्रमाणे सायंकाळी पालखीची मिरवणूक संपूर्ण कॉलनी परिसरात अतिशय उत्साहाने काढली जात असते सदर पालखीची आरती व पूजन श्री. जतीन बोरसे यांनी परिवारासह करून पालखी सोहळ्याची सुरुवात करण्यात आली त्याचप्रमाणे सदर कार्यक्रमात मंदिराचे विश्वस्त मंडळ पदाधिकारी श्री. भाईदास पाटील, श्री. देवीदास पवार, श्री. चंद्रकांत बडगुजर, श्री. चंद्रशेखर पाटील यांनी पालखी सोहळ्याची सुनियोजन केले होते
तसेच कॉलनी परिसरातील अनेक महिला भगिनींनी गरब्याचे नृत्य करून व फुगडी खेळून पालखी सोहळ्याच्या मिरवणुकीची अधिक शोभा आणली
सर्व कार्यक्रमात ज्येष्ठ व तरुण शिवभक्त आनंदाने सहभाग घेत असतात तसेच रात्री कीर्तनाचा कार्यक्रम देखील मोठ्या आनंदात झाला असून शिंदखेडा शहरातील अनेक भक्तांनी कीर्तनाच्या लाभ घेतला
सदर भक्तीमय कार्यक्रम यशस्वीतेसाठी कॉलनी परिसरातील श्री तुषार पवार, श्री राकेश बडगुजर, श्री विनोद पाटील, श्री जयपाल रावल, श्री धनराज कुवर, श्री. संतोष माळी, दर्पण पवार, पप्पू देसले व रुपेश बडगुजर तसेच सर्व ज्येष्ठ व तरुण शिवभक्तांनी परिश्रम घेतले
दरवर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी कॉलनी परिसरातील सर्व नागरिक अतिशय आनंदात व उत्साहात सर्व कार्यक्रमांमध्ये अतिशय आनंदात व खेळीमेळीच्या वातावरण आपल्या परिवारासह सहभागी होत असतात