spot_img
spot_img

तपासाची चक्रे वेगाने फिरली; नंदुरबार तालुका पोलिसांनी अल्पावधीत दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या

तपासाची चक्रे वेगाने फिरली; नंदुरबार तालुका पोलिसांनी अल्पावधीत दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या

नंदुरबार : नंदुरबार तालुक्यातील श्रीरामपूर शिवारातून शेतातील घोडा चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी तत्पर तपास करत अवघ्या काही दिवसांत दोन संशयित आरोपींना अटक करण्यात यश मिळविले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी आसीफ रफा कुरेशी (वय ३४, व्यवसाय शेती, रा. श्रीरामपूर, पोस्ट वाघाळे, ता. जि. नंदुरबार) यांच्या शेतातील सुमारे ७० हजार रुपये किमतीचा लाल रंगाचा घोडा अज्ञात चोरट्यांनी दि. ७ मार्च रोजी सायंकाळी ६.०० ते ८ मार्च रोजी सकाळी ६.०० वाजेदरम्यान चोरून नेला होता.
या प्रकरणी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १९२/२०२६ नोंदवून भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३०३(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

तपासादरम्यान पोलिसांनी पंकज अशोक कोळी (वय २६, रा. ओसर्ली, ता. नंदुरबार) व राकेश आनंदा पाटील (वय ३२, रा. निंभेल, ता. नंदुरबार) या दोघांना १५ मार्च रोजी पहाटे ४ वाजता अटक केली. आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले असून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.

*ही कारवाई* पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे व नंदुरबार उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिनेश भदाणे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार विनायक सोनवणे, काशिनाथ साळवे व एकनाथ ठाकरे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!