spot_img
spot_img

दभाशी येथे शिवजयंती निमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन

दभाशी येथे शिवजयंती निमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन

दभाशी  :– हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दभाशी गावात विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात प्रसिद्ध व्याख्याते ॲड.प्रितम प्रविण निकम हे मार्गदर्शन करणार आहेत.

दि.१८ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ८.०० वाजता शनी महाराज चौक येथील सभा मंडपात हा कार्यक्रम होणार आहे. शिवरायांच्या पराक्रम, नेतृत्वगुण, स्वराज्य संकल्पना आणि आजच्या तरुण पिढीसाठी त्यांचे विचार किती प्रेरणादायी आहेत, यावर व्याख्यानातून प्रकाश टाकण्यात येणार आहे.

समस्त ग्रामस्थ दभाशी यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सर्व शिवप्रेमी, युवक-युवती आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

शिवजयंतीच्या निमित्ताने गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे. 🚩

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!