रामीत TB मुक्त भारत अभियानांतर्गत मोफत छातीचा एक्स-रे शिबिर
२१२ लाभार्थ्यांची तपासणी; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
धुळे जिल्हा फिरते एक्स-रे पथक व उपजिल्हा रुग्णालय, दोंडाईचा यांच्या संयुक्त विद्यमाने आयुष्मान आरोग्य मंदिर धावडे अंतर्गत रामी (ता. ___) येथे TB मुक्त भारत अभियान अंतर्गत मोफत छातीचा एक्स-रे (क्ष-किरण) तपासणी शिबिर यशस्वीरीत्या पार पडले. या शिबिरात एकूण २१२ लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली.
हे शिबिर दि.
२८ जानेवारी २०२६ (बुधवार) रोजी ग्रामपंचायत रामी येथे आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे आयोजन डॉ. सोनिया बागडे (जिल्हा क्षयरोग अधिकारी, धुळे) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी धुळे DTC येथील डॉ. तुप्ती अग्रवाल, मृणाल मॅडम, शिरसाठ नाना, तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. कदम यांनी विशेष सहकार्य केले.
शिबिरात प्रामुख्याने ६० वर्षांवरील नागरिक, मधुमेह व रक्तदाबाचे रुग्ण, जास्त काळ खोकला असलेले, सतत आजारी असणारे, कमी वजनाचे तसेच क्षयरुग्णांच्या संपर्कात आलेले संशयित रुग्ण यांची तपासणी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सरपंच कुलदीप दादा गिरासे, विनोद हिरे, अक्षय मराठे, समुदाय आरोग्य अधिकारी दिपक साटोटे, STS दोंडाईचा सचिन ठाकूर, पवन दादा, संदीप दादा, आरोग्यसेविका नीता फड, आशा सेविका अरुणा रामराजे, जयश्री माळी, सुनंदा गिरासे, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका तसेच ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.
TB मुक्त भारत या उद्दिष्टाच्या दिशेने हे शिबिर एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले असून, यामुळे क्षयरोगाचे लवकर निदान होऊन वेळेत उपचार मिळण्यास मदत होणार आहे. शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाच्या यशाबद्दल उपकेंद्र धावडेच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले.







