चिमठाणे गावतील जि.प.शाळा नवीन इमारत उभारण्याची महेंद्र पाटील ( सोनू फौजी )यांची पालकमंत्री यांच्या कडे मागणी
चिमठाणे :_ येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत ही खूपच जीर्ण झालेली असून गेल्या दीडशे ते दोनशे वर्षं जुनी इमारत असून चिमठाणे जिल्हा परिषद शाळा क्र1 येथे शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना खूपच प्रमाणात अनेक समस्या निर्माण होत असून गेल्या अनेक दिवसांपासून पालकांची मागणी असून जिल्हा परिषद शाळा ही पावसाळ्यात खूपच गळते म्हणून विद्यार्थ्यांना बसन्यासाठी जागा नसते तसेच पाण्याची सोय सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो तरीही चिमठाणे गावाचे सामाजिक कार्यकर्ते तसेच भूमिपुत्र माजी सैनिक महेंद्र गोकूळ पाटील यांनी चिमठाणे गावतील जिल्हा परिषदेच्या शाळेत जाऊन शाळेच्या इमारतीची जिल्हा परिषदेच्या मुख्याध्यापक यांना विचारपूस केली असता शाळेच्या दुरुस्ती बाबतीत विचारपूस केली असता मुख्याध्यापक मॅडम यांनी सर्व प्रकारची समस्या सांगितल्या असत्या यांची दखल घेत चिमठाणे गावाचे माजी सैनिक यांनी आश्वासन दिले की जिल्हा परिषद शाळेची इमारत आपण डिजिटल स्वरूपात नवीन इमारत उभारणी साठी शासन दरबारी व पालकमंत्री आदरणीय जय कुमार भाऊ रावल यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच पालकमंत्री यांना भेटून सदर इमारती बाबतीत लवकरात लवकर पत्र व्यवहार करून निवेदन सादर करण्यात येणार असल्याने चिमठाणे गावातील शाळेच्या मुख्याध्यापिका यांना सांगितले त्याच प्रमाणे दि 24 जानेवारी2026 रोजी चिमठाणे गावाचे महेंद्र पाटील यांनी धुळे जिल्हा पालकमंत्री यांना समक्ष भेटून चिमठाणे जिल्हा परिषदेच्या इमारती बाबतीत सर्व समस्या जीर्ण झालेली इमारत तसेच अनेक वर्षे पासून ह्या इमारती ची कुठल्या ही प्रकारची दुरुस्ती करण्यात आलेली नसून धोकादायक इमारत विद्यार्थ्यांना च्या जीवावर अति प्रसंग घडू शकतो असे जयकुमार भाऊ रावल यांच्या निदर्शनास आणून दिल्या नंतर प्रथम जयकुमार रावल यांनी स्वतः महेंद्र पाटील यांना बोलावून सांगितले की महेंद्र पाटील तुम्ही मला तसे आशयाचे पत्र द्या मी तात्काळ कारवाईचे आदेश देतो त्या संदर्भात आपण शालेय शिक्षण मंत्री तसेच जिल्हा परिषदेच्या मार्फत लवकरात लवकर जिल्हा परिषदेच्या चिमठाणे गावाचे शाळेच्या इमारतीच्या नवीन डिजिटल स्वरूपात उभारणी करण्यासाठी मी स्वतः यात लक्ष घालून आपल्या गावसाठी इमारतीच्या कामासाठी पालकमंत्री या नात्याने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जाईल तसेच आपण जे काही काम करत आहे ते देखील अतिशय चांगल्या पद्धतीने करत असून त्यामुळे गावात एक शिक्षण क्षेत्रात भर देखील पडेल व आपल्या सोबतच मी देखील आपल्याला मदत नक्कीच करेल यात शंका नाही लवकर यांचा पाठपुरावा करून प्रस्ताव तयार करून शासन दरबारी पाठवला जाईल असे आश्वासन दिले जयकुमार रावल पालकमंत्री यांनी महेंद्र पाटील यांना दिले असून त्याबद्दल महेंद्र पाटील यांनी पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली आपले पत्र देऊन तसेच जयकुमार रावलजी पालकमंत्री यांच्या सुचने नुसार सर्वच कागदपत्रे सादर करून प्रस्ताव तयार करून शासन दरबारी पाठवू असे देखील सांगितलं असून चिमठाणे गावात अशी जिल्हा परिषद शाळा उभारू की आजपर्यंत तालुक्यातील कोणतीही शाळा नसेल असे आश्वासन चिमठाणे गावचे नागरिकांना दिलें असून लवकरच पाठपुरावा करून शाळा इमारती उभारण्यात येईल तसेच या पासून विद्यार्थीची समस्या दूर होईल …







