चिमठाणे गावातील बँक ऑफ इंडिया शाखेतील बँक कर्मचारीचा मनमानी कारभार उघड
चिमठाणे गावातील नागरिकांना घातला बँक ऑफ इंडिया मॅनेजरला घेराव
चिमठाणे : – गेल्या अनेक वर्ष पासून चिमठाणे गावात बँक ऑफ इंडिया ही शाखा असून या शाखेला अनेक खेड गाव जोडलेले असून चिमठाणे परिसरातील अनेक नागरीक बँकेत पैसे काढण्यासाठी टाकण्यासाठी येतात अनेक व्यवसाय करणारे नागरिक हे ह्या बँकेत कर्ज काढण्यासाठी येत असतात सदर बँकेत चिमठाने गावातील अनेक नागरिकांनी व्यवसाय लोण घेतले होते तरीही अनेक व्यवसाय करणारे दुकान दार यांनी वेळेत आपले कर्ज हे निल केले असता तरीही चिमठाणे गावातील नागरिकांनी अनेक वर्षांपासून आपले कर्ज ची फाइल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत दिली असून 5 ते 7 वर्षे झाली तरीही बँक ऑफ इंडिया चे मॅनेजर हे फाईल पाहायला तयार होत नाही तसेच जिल्हा उद्योग मुद्रा लोण होम लोण अश्या अनेक प्रकारें सरकार ने स्कीम काढलेले आहेत. परंतु बँक ऑफ इंडिया चे मॅनेजर हे फाइल रिजेक्ट करून मला काही माहिती आहे याबाबत अश्या प्रकारे उडवाउडवीची उतरे देऊन शेतकरी वर्ग तसेच व्यवसाय करणाऱ्या नागरिकांना वर्षभर फिरवून फाइल वरून मंजूर होत नाही हे मी काही करू शकत बाकीच्या लोकांना सांगता तुमचे सिव्हील खराब आहे. अश्या वेगवेगळ्या काही पण कारण दाखवून नागरिकांना लोण देत नाही. अनेक वेळा महिलां देखील kyc करण्यासाठी येतात त्याना देखील उडवाउडवीची उत्तरं दिली जातात बँक ऑफ इंडियाच्या कर्मचारी चा मनमानी कारभार हा चव्हाट्यावर दिसुन येत आहे.चिमठाणे गावातील सामाजिक कार्यकर्ते महेंद्र पाटील (सोनू फौजी) यांनी बँक मॅनेजर यांना विचारपूस केली असता मॅनेजर यांनी कुठल्याही प्रकारचे समाधान कारक उत्तर दिले नाही तसेच उर्मट पणाने उत्तर दिले तसेच 5 ते 10 वर्षे लोटली गेली तरीही अनेकांना लोण मिळत नाही हे सदर बँक ऑफ इंडियाच्या कर्मचारी वर गुन्हा दाखल करून निलंबित करण्यात यावे अशी मागणी चिमठाणे गावातील प्रदीप सोनवणे ईश्वर वाडीले सागर वाडीले योगेश गिरासे बाळा मराठे गणेश माळी कमलेश माळी बंटी नगराळे इ नागरिकांना सह समाजिक कार्यकर्त्य महेंद्र गोकुळ पाटील(सोनू फौजी) तसेच गावातील खेड्यातील नागरिकांनी देखील केली आहे.







