spot_img
spot_img

निष्ठावान कार्यकर्त्यासाठी माजी खासदार डॉ.हिनाताई स्वतः बनल्या सूचक….

निष्ठावान कार्यकर्त्यासाठी माजी खासदार डॉक्टर हिनाताई स्वतः बनल्या सूचक, केतन भैय्या रघुवंशी यांच्या उमेदवारी अर्जावर दिली स्वाक्षरी!
कार्यकर्त्यांनी अनुभवला मनाला भावणारा प्रसंग

नंदुरबार  :- निष्ठावान कार्यकर्ता म्हटला की नेत्याची मेहरनजर त्या कार्यकर्त्यावर असतेच. याचा प्रत्यय आज नंदुरबार येथे उमेदवारी दाखल करताना आला. भाजपाचे नेते माजी मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांचे निष्ठावान कार्यकर्ते तथा भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष केतन भैय्या रघुवंशी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना महासंसद रत्न माजी खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांनी स्वतः सूचक म्हणून स्वाक्षरी दिली आणि आवर्जून उपस्थित राहिल्या. तो प्रसंग पाहून भाजपाच्या उपस्थित कार्यकर्त्यांचा उत्साह आणखी द्विगुणीत झालेल पाहायला मिळाला.

कोणाच्या उमेदवारी अर्जावर स्वतः नेत्याने सूचक म्हणून स्वाक्षरी केल्याचे ऐकिवात नाही; असे उपस्थित जाणकारांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर हा प्रसंग उपस्थित सर्व कार्यकर्त्यांच्या मनाला स्पर्श करून गेला. डॉक्टर हिनाताई गावित यांच्या नेतृत्वात आज भारतीय जनता पार्टीच्या सर्व इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. जातीने सर्व कागदपत्र तपासून घेण्यासाठी आणि ए बी फॉर्म जोडण्यासाठी डॉक्टर हिनाताई गावित या परिश्रम घेताना दिसल्या. माजी मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित, नंदुरबार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांनी देखील सलग रात्रभर जागून मार्गदर्शन करीत कागदपत्रांची पूर्तता करून घेतली. नंदुरबार नगर परिषदेच्या कार्यालयात डॉक्टर हिनाताई गावित या स्वतः उपस्थित राहिल्या. त्याप्रसंगी केतन भैय्या रघुवंशी हे देखील प्रभाग क्रमांक आठ ब मधून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित होते. त्यावेळेस चक्क सुचक म्हणून स्वतः डॉक्टर हिनाताई गावित यांनी आपले नाव त्यांच्या अर्जावर लिहिण्यास अनुमती दिली एवढेच नाही तर स्वाक्षरी करून स्वतः अधिकाऱ्यांसमोर जातीने उपस्थित राहिल्या. केतन भैय्या रघुवंशी हे नंदुरबार जिल्ह्यातील हिंदूनिष्ठ कार्यकर्ता म्हणून प्रसिद्ध आहेत. साहसी गोरक्षक म्हणून देखील त्यांनी कार्य गाजवले आहे. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि भारतीय जनता युवा पार्टी च्या विविध पदांवर त्यांनी कार्य केलेले आहे. मागील निवडणुकीत त्यांनी प्रथमच नगरसेवक पदाची निवडणूक लढवली होती आणि लक्ष वेधून घेणारी उल्लेखनीय मते प्राप्त केली होती.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!