अरुण रामराजे सह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते रिपब्लिकन सेनेच्या वाटेवर.
मुंबई :- काल मुंबई आंबेडकर भवन येथे रिपब्लिकन सेनेचे सरसेनापती आनंदराज आंबेडकर साहेब यांची रिपब्लिकन सेनेचे कार्यालयात भेट घेतली व विविध विषयांवर चर्चा केली.आगामी नगरपालिका जिल्हा परिषद निवडणुकीत रिपब्लिकन सेनेची भुमिका काय असेल संघटनात्मक संरचना व महाराष्ट्रातील दलित आदिवासी मागासवर्गीय समुहातील ज्वलंत विषयावर आदरणीय आनंदराज जी यांच्याशी व्यापक चर्चा व आगामी काळात लढ्याची रणनिती काय असेल याची अपेक्षा व्यक्त करीत चर्चा झाली.या वेळी यांत वंचित बहुजन आघाडी चे माजी उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा दलित आदिवासी मागासवर्गीय च्या लढ्यात सक्रिय लढवैया व्यक्तीमत्व अरुण भाऊ रामराजे.यासह वंचित चे माजी तालुकाध्यक्ष गजेंद्र निकम वंचित चे जिल्हा उपाध्यक्ष तथा संपादक कृष्णा भाऊ कोळी जिल्हा सरचिटणीस माजी नगरसेवक उद्धव पिंपळे हे उपस्थित होते तरी आगामी काळात लवकरच जिल्ह्यातील आजी माजी पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन जाहीर सभेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे अरुण भाऊ रामराजे यांनी ग्वाही दिली.







