रविद्र राजपूत यांना वडाळी गटात मतदारांचा वाढता पाठिंबा
सारंगखेडा :- जिल्हा परिषद निवडणुकीच्या अधिकृत तारखा घोषित होण्यास अद्याप काही अवकाश आहे परंतु सर्वत्र इच्छुक उमेदवारांनी आप-आपल्या गटात मतदार राजाच्या गाठीभेटी घेण्यास प्रारंभ केलेला दिसून येत आहे.
या धामधुमीतच नंदुरबार जिल्हा परिषद निवडणुकीत वडाळी गटातून प्रसिद्ध युवा उद्योगपती व समाजसेवी श्री.रविद्र राजपूत यांनी उमेदवारी करण्याचे जाहीर केलेले आहे.
रविंद्र राजपूत हे भाजपाचे मूळ कट्टर कार्यकर्ते व स्थानिक रहिवाशी असल्याने त्यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावीत यांची भेट घेऊन उमेदवारीचा दावा या आधीच केलेला आहे.
राजपूत हे देऊर गावाचे मूळ रहिवाशी असून त्यांनी आजपर्यंत अनेक समाजोपयोगी कामे केलेली आहेत.
त्यांना अनेक राष्ट्रीय स्तराचे पुरस्कार प्राप्त असून असंख्य बेरोजगार युवकांना त्यांनी हक्काचा रोजगार दिलेला आहे
.
त्यांनी उमेदवारीची घोषणा करताच वडाळी गटात चैतन्याचे वातावरण निर्माण झालेले असून गावागावातून लोक त्यांना आपला पाठिंबा दर्शवीत आहेत.
नुकताच त्यांनी देऊर, टेंभा,वडाळी,फेस,बामखेडा,दोंडवाडे, काकरदा दिगर, खैरवे, काकरदा खुर्द , अभनपूर, भडगाव, हिंगणी व तोरखेडा इ गावांचा दौरा केला. त्यांनी जनतेच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्या प्राधान्याने सोडविण्यासाठी प्रयत्न करू असा शब्द दिला. त्यांनी मतदार राजांच्या भेटी घेतल्या. त्यांचे गावा-गावातून नागरिकांंनी ऊत्स्फूर्त पणे स्वागत केले.
आपल्या परिसराचा व गटाच्या विकासासाठी एक युवा उद्योगपती युवक पुढे येत असल्याने ग्रामीण भागात प्रचंड उत्साह पाहण्यास मिळत आहे. आपल्या काळात आपण निष्पक्ष पद्धतीने जनसेवेचे व्रत जोपासू,जागरूक लोकप्रतिनिधी म्हणून आपली जबाबदारी पार पाडू व परिसराचा कायापालट करू अशी भावना रविभाऊ यांनी जनतेशी बोलतांना व्यक्त केली.
2. नोव्हेंबर रोजी त्यानी वडाळी गावात आपल्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले.







