वरूळ येथील सरपंच, उपसरपंच,ग्रा.पं.सदस्यांसह प्रमुख कार्यकर्त्यांचा ना.जयकुमारभाऊ रावलांच्या नेतृत्वात भाजपात प्रवेश,,
शिंदखेडा :- वरूळ, ता.शिंदखेडा येथील काँग्रेस व राष्ट्रवादी (श.प.गट) प्रमुख पदाधिकाऱ्यांसह सरपंच राजेंद्र पाटील, उपसरपंच व युवक काँग्रेसचे पदाधिकारी राकेश गिरासे यांच्यासह ग्रा.पं.सदस्य व प्रमुख कार्यकर्त्यांचा आज शिंदखेडा येथे राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा पालकमंत्री ना.जयकुमारभाऊ रावल यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षात प्रवेश केला, यावेळी प्रमुख मान्यवर
कार्यक्रमास भाजपाचे ज्येष्ठ नेते,जिल्हाध्यक्ष तसेच इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. भाजपाच्या ‘सबका साथ, सबका विकास’ या ध्येयधोरणाने प्रेरित होऊन आणि तालुक्यातील सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून कार्यकर्त्यांनी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
या प्रवेशामुळे तालुक्यात भाजपाचे संघटन अधिक बळकट होणार असल्याची प्रतिक्रिया स्थानिक नेतृत्वाकडून व्यक्त करण्यात आली.
भारतीय जनता पक्षात मनःपूर्वक स्वागत!!!
शिंदखेडा तालुका