spot_img
spot_img

जागतिक आदिवासी विश्व गौरव दिवस समिती तर्फे शिंदखेडा येथे बैठक संपन्न झाली

जागतिक आदिवासी विश्व गौरव दिवस समिती तर्फे शिंदखेडा येथे बैठक संपन्न झाली

प्रतिनिधी – भूषण पवार

शिंदखेडा : – येथे 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी विश्व गौरव दिवस समिती तर्फे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीत येत्या 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी विश्व गौरव दिवस साजरा करण्यासंदर्भात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.सांस्कृतीक देखावे, वाद्यसह पारंपारिक
वेशभुषा पेहरावाने भव्य सांस्कृतिक रॅलीचे आयोजन करण्याचे ठरले.बिजासनी मंगल कार्यालय येथे सामाजिक प्रबोधनाचा कार्यक्रम होणार आहे. या विश्व आदिवासी दिवस कार्यक्रमात जास्तीत जास्त आदिवासी बांधवांनी आपल्या आदिवासी वेश भूषेत सहभागी व्हावे, असे जाहीर आवाहन समिती तर्फे करण्यात आले आहे.यावेळी रॅलीचे नियोजन व कार्यक्रमाला आलेले समाज बांधवांसाठी जेवणाची व्यवस्था करणे व बॅनर छापणे प्रमुख पाहुणे अशा बऱ्याच गोष्टींवर चर्चा करण्यात आली.सदर बैठकीस आदिवासी समाजाचे जेष्ठ नेते रामनाथ आप्पा मालचे तसेच टेंमलाय गावाचे सरपंच अण्णा मालचे माजी पंचायत समिती शिंदखेडा सदस्य प्रकाश सोनवणे,भगवान दादा पिंपळे व A.T.S चे किशोर ठाकरे आदिवासी एकता परिषदेचे शिंदखेडा तालुका सचिव गुलाब दादा सोनवणे, विष्णू ईशी ,विनोद सोनवणे ,सतीश मालचे ,निर्मल गायकवाड ,पंकज फुले ,देवदास सोनवणे, श्याम भाऊ सोनवणे ,अतुल पवार ,रंजीत बागुल ,मनोज मोरे, दादाभाई मोरे ,दीपक फुले ,नरेश सोनवणे ,संग्राम सोनवणे, सुरेश मालचे ,प्रकाश पाडवी ,सुनील ठाकरे ,शिवानंद ठाकरे, विशाल ठाकरे, दीपक सोनवणे, नवनाथ भील ,श्याम पांढरे ,सुनील मालचे, बापू भील ,बाबुलाल भिल ,तिरसिग भिल ,सतीश धनगर, रामलाल मालचे ,अजय पवार ,किसन ठाकरे ,रामचंद सोनवणे ,ईश्वर सोनवणे ,अजय सोनवणे, समाधान सोनवणे तसेच समाज बांधव उपस्थित होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!