*शिक्षणमहर्षी दादासाहेब राऊळ प्राथमिक शाळेत नवागतांचे मोठ्या दिमाखात स्वागत, मिरवणूक काढून केले नवागतांचे स्वागत*
दोंडाईचा: उन्हाळ्याच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर शाळेची घंटा वाजली. चिमुकल्यांनी पहिल्याच दिवशी शाळेची पायरी चढली.स्वोध्दारक विद्यार्थी संस्थेच्या शिक्षणमहर्षी दादासाहेब राऊळ प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली व नवीन दाखल झालेल्या विद्यार्थ्यांची गावभागातून वाजत-गाजत मिरवणूक करण्यात आली, तद्नंतर शाळेच्या प्रवेशद्वारावर नवागतांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमात त्यांना मोफत गणवेश, पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली त्यामुळे विद्यार्थी व पालकात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
शाळेच्या पहिल्या दिवशी नवे शालेय साहित्य, नवा गणवेश, नवे सवंगडी, नवे शिक्षक अशा प्रसन्न उत्साही वातावरणात आज शाळेचा पहिला दिवस होता.प्रारंभी मुख्याध्यापक श्री. महेंद्र गिरासे,श्रीमती इंदिरा राजपूत,श्रीमती आर. यु. ठाकूर यांच्या सह सर्व शिक्षकांनी विद्यार्थी व पालकांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. यावेळी प्रवेशोत्सव कार्यक्रम साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जेष्ठ शिक्षिका श्रीमती आर.यु. ठाकूर तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री.रोहिदास सोनार,दीपक पाटील आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सरस्वती पूजन, शिक्षणमहर्षी दादासाहेब रावल यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती ठाकूर यांनी नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापक श्री. एम. बी. गिरासे यांनी नवीन शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले,ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती इंदिरा राजपूत यांनीही उपस्थित पालक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आपल्या पाल्यांचा पहिला दिवसांची एक अनमोल आठवण म्हणून प्रत्येकी एक वृक्ष लागवड करावी व त्यांचे संगोपन करावे असे आवाहन केले. कार्यक्रम अखेरीस सर्व विद्यार्थी व पालकांना मिष्ठान्न भोजन वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री, ना.जयकुमारभाऊ रावल यांनी नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा संदेश दिला, संस्थेचे सेक्रेटरी श्री.सी.एन राजपूत, सा.प्र.विभागाचे सचिव श्री.ललितसिंग गिरासे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
सूत्रसंचालन श्री. अनिल गिरासे तर आभार श्री. हेमंत वंजारी यांनी मांडले, कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.