*आमदार जयकुमार रावल यांच्या कॅबिनेट मंत्रीपदासाठी महिला सरपंचांचा उज्जैन येथील महाकाल मंदिरात साखडे*
शिंदखेडा :- महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत शिंदखेडा विधानसभेचे उमेदवार आमदार जयकुमार रावल हे सलग पाचव्या दीड लाख च्या मताधिक्याने त्यांचा विजय झाला. आमदार रावलांनी मागील चार पंचवार्षिकांमध्ये सिंचन, शिक्षण व उद्योग या त्रिसूत्री संकल्पनेनुसार मोठ्या प्रमाणावर जनतेची विकासाची कामे केली आहेत. तालुक्यातील गोरगरीब, शोषित ,वंचित ,दलित ,आदिवासी ओबीसी अशा सर्व समाजातील शेवटच्या घटकापर्यंत त्यांनी विकासाचे काम पोहोचवली आहेत .जर तालुक्याचा शाश्वत विकास करायचा असेल तर पुन्हा पाचव्यांदा आमदार व कॅबिनेट मंत्रीपदी विराजमान व्हावे. यासाठी तालुक्यातील महिला सरपंच सोनूशेलु सरपंच प्रियंका बडगुजर ,विखरण सरपंच अनिता पवार ,रामनगर सरपंच ज्योती पाटील ,अंजनविहिरे सरपंच अर्चना पाटील ,सवाई मुकटी सरपंच कविता पाटील या पाचही महिला सरपंचांनी उज्जैन येथील महाकाल महादेव मंदिरात 55 किलो पेड्यांचा प्रसाद चढवण्याचा संकल्प केला आहे.