प्रतिनीधी – निरक गिरासे
चिमठाणा :- दिनांक १७/०८/२०२४ रोजी सपोनी किरण बर्गे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एक पिक वाहन चालक हा त्याचे वाहनात विना पास-परमिट विदेशी दारु भरुन तिची चोरटी विक्री करण्याचे उद्येशाने वाहतुक करुन घेवुन तामथरे मार्गे दोडाईचा कडेस जाणार असल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी व त्यांचे सह श्रेणी पोसई गुलाब टाकरे, सोबत पोहेको १३५८ प्रशांत पवार, पोकों/१४६६ विनोद बडे. पोकों / १६८९ विशाल सोनवणे अशांनी मा. पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांचे मार्गदर्शनात तामथरे ता.शिदखेडा गावी सापळा रचुन केलेल्या कारवाईमध्ये १) रॉलय स्पेशल, २) रॉयल चॅलेज, ३) रॉयल स्टंग, ४) इंम्पेरीअल ब्ल्यु. ५) मॅजोक मोमेन्ट कंपनीच्या १८० मि ली मापाच्या विदेशी दारु एकूण किमत ३.९५,६६४/- रुपये किमतीची आणि २,००,०००/- रुपये किमतीची बोलेरो पिकअप वाहन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी वाहन चालक राम लक्ष्मण कुचन वय ३० वर्ष व्यवसाय खाजगी वाहन चालक रा. अंजुर फाटा, गणेश नगर चाळ भिवंडी जि.ठाणे याचे विरुध्द पोना साचीर शेख यांनी दिलेल्या फिर्याद वरुन महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम सन १९४९ चे कलम ६५ (अ) (ई), ८३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कार्मागरी ही मा.पोलीस अधिक्षक श्री श्रीकांत धिवरे, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री किशोर काळे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री भागवत सोनवणे, अशांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री बाळासाहेब थोरात, श्रेणी पोसई गुलाब ठाकरे, सोयत पोहेको १३५८ प्रशांत पवार, पोकों/१४६६ विनोद बडे. पोकों/१६८९ विशाल सोनवणे अशांनी मिळून केलेली आहे.