*संपादकीय*
शिंदखेडा :- दिनांक १६/०८/२०२४ रोजी पोलीस निरीक्षक श्री बाळासाहेब थोरात यांना गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, भडणे ता. शिंदखेडा गावाचे शिवारात मनोहर देवीदास देसले यांचे शेतात विहीरी लगत काही इसम हे पत्र्याचे शेड करुन तेथे गैरकायदेशीररित्या स्पिरीट नावाचा गुंगिकारक मादक पदार्थापासुन बनावट व मानवी आरोग्यास अपायकारक अशी बनावट दारु तयार करण्यासाठी आपले कब्जात बाळगुन त्यापासुन बनावट देशी व विदेशी दारु तयार करुन, दारु तयार करण्याचा कारखाना चालवित आहे, अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने
मा.पोलीस निरीक्षक श्री.बाळासाहेब थोरात साो,पोसई राजु सुर्यवंशी, श्रेणी पोसई गुलाब टाकरे, पोहेकॉ/५८६ हेमराज जाधव, पोकॉ/०८ कैलास चौधरी, पोकॉ/७४४ रुपेश चौधरी, पोकॉ/७२१ पंकज कुलकर्णी, मपोकॉ १३३९ वैशाली वाहुळे, चापोकों ३२१ भिल, चापोकॉ/४९७ अशांनी शासकीय पंचां समक्ष भडणे ता. शिंदखेडा गावाचे शिवारातील इसम नामे मनोहर देवीदास देसले यांचे शेतात दोन इसम हे विहीरी जवळ तयार करण्यात आलेल्या पत्रटी शेड मध्ये जमिनीवर प्लॅस्टिकचा कागद टाकुन त्यावर रिकाम्या काचेच्या बाटलीत आंबट उग्र वासाची दारु सदृश्य रसायन भरुन प्लॅस्टिकच्या ट्रे मध्ये सिलबंद केलेल्या बाटल्या, पत्रटी बुच, डिंक बॉटल, चिकट पट्टी रोल, पुठ्ठयांचे रिकामे खोके, बाटलीचे बुच सिलबंद करणेकामी लागणारे कॅपिंग मशिन अशा साधनांसह बनावट दारु तयार करण्याचा कारखाना चालवित असुन पोलीस रेड आल्याचे पाहुन तेथुन पळुन गेल्याने सविस्तर पंचनामा करुन शेत मालक मनोहर देवीदास देसले आणि घटनास्थळा वरुन पळुन गेलेले दोन इसम नांव गांव समजुन आले नाही अशां विरुध्द बी.एन.एस कायदा कलम १२३ सह मु.प्रो.का. क ६५ (ई) (फ) ८१,८३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी ही मा.पोलीस अधिक्षक श्री.श्रीकांत धिवरे, मा.अपर पोलीस अधिक्षक श्री.किशोर काळे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री भागवत सोनवणे, अशांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री बाळासाहेब थोरात, पोसई राजु सुर्यवंशी, श्रेणी पोसई गुलाब ठाकरे, पोहेकॉ/५८६ हेमराज जाधव, पोकॉ/०८ कैलास चौधरी, पोकॉ/७४४ रुपेश चौधरी, पोकॉ/७२१ पंकज कुलकर्णी, मपोकॉ १३३९ वैशाली वाहुळे, चापोकॉ ३२१ भिल, चापोकॉ/४९७ अशांनी मिळुन केलेली आहे.