24.1 C
New York
Thursday, September 12, 2024

Buy now

शिंदखेडा मतदारसंघात सर्वसामान्य कार्यकर्त्याची अडवणूक होतेय का ?

*शिंदखेडा मतदारसंघात सर्वसामान्य  कार्यकर्त्याची अडवणूक*

संपादकीय —— महेंद्रसिंग गिरासे

शिंदखेडा :- शिंदखेडा मतदारसंघात आगामी निवडणूका लक्षात घेता राजकारणाचे वातावरण काही प्रमाणात तापले आहे. कार्यकर्त्यांच्या अंतर्गत गटबाजी व वादामुळे पक्षाचे नुकसान होत असल्याची जोरदार चर्चा सर्वसामान्य जनतेतून होत आहे.मतदार संघात काही गावांमध्ये स्थानिक नेते कार्यकर्त्यांची पिळवणूक करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.जुने कार्यकर्ते व नवीन कार्यकर्ते असा भेद दिसून येत आहे तर जुने कार्यकर्ते किंवा नेते नवीन कार्यकर्त्यांना श्रेयवादाच्या विळख्यात अडकलेले दिसून येत आहेत.प्रत्येक गावात पक्षाचे दोन गट पहावयास मिळत असतात.
पक्षासाठी काही काम करायचं असेल ते आमच्या द्वारे करा पक्षश्रेष्ठींशी आम्ही बोलू या वादातून काही निष्ठावंत कार्यकर्ते नाराज असल्याचे दिसून येत आहेत.पक्षाच्या अंतर्गत गटबाजीमुळे गावातील स्वयंघोषित पुढारी व पदाधिकारी गावागावात पक्षाच्या नावाने सर्वसामान्य जनतेची व कार्यकर्ताची अडवणूक तसेच पिळवणूक करत असल्याची चर्चा जोर धरत आहे, त्यामूळे शिंदखेडा मतदारसंघात आगामी निवडणुक भाजपासाठी अडचण निर्माण करेल का ? असे चित्र दिसून येत आहे. पक्षश्रेष्ठींनी याकडे लक्ष देऊन लवकरच श्रेय वादाच्या विळख्यात सापडलेल्या स्वयंघोषित नेत्यांना व पुढाऱ्यांना ओळखून त्यांना जाब विचारण्यात यावा अशी मागणी सच्च्या कार्यकर्त्यांमधून होत आहे.
तरूण तडफदार वर्गाला किंव्हा पक्षासाठी निष्ठेने काम करत असलेल्या व गावाचा सर्वांगीण विकास करत असलेल्या कार्यकर्त्याला मानसिक त्रास देऊन आपले अस्तित्व टिकवून ठेवणाऱ्या गावपुढाऱ्याला या पुढे सर्वसामान्य भाजपा कार्यकर्ता धडा शिकवणार ,हे माञ शंभर टक्के खर आहे.

यापुढे पक्षश्रेष्ठींनी गावपातळीवर विशेष लक्ष देऊन सर्वसामान्य मतदार किंव्हा भाजपा कार्यकर्ता दुरावला जाऊ नये या दृष्टीने ठोस पाऊले उचलली पाहिजेत, तरच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्याचा मोठा फायदा पक्षाला होईल.

 

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!