17.3 C
New York
Sunday, September 8, 2024

Buy now

विज्ञान व तंत्रज्ञानाचा उपयोग मानव जातीच्या कल्याणासाठी व्हावा…..**गटशिक्षणाधिकारी डॉ.सी. के.पाटील*

संपादकीय,,,,,


शिंदखेडा:-सध्याचे युग हे विज्ञान व तंत्रज्ञानाचे युग असून नवनवीन तंत्रज्ञानासोबतच कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्रज्ञानाचा उपयोग शिक्षणासाठी व मानव जातीच्या कल्याणासाठीच व्हावा. त्याचा दुरुपयोग होऊ नये असे आवाहन शिंदखेडा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी डॉ. सी. के. पाटील यांनी केले.

पंचायत समिती (शिक्षण) शिंदखेडा, शिंदखेडा तालुका मुख्याध्यापक संघ, शिंदखेडा तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघाच्या संयुक्त विद्यमाने नूतन माध्यमिक व विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालय दोंडाईचा येथे दि. 26 जुलै रोजी विद्यार्थी विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले त्याप्रसंगी डॉ. सी. के. पाटील बोलत होते. या विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात शिंदखेडा तालुक्यातील विविध शाळांनी सहभाग नोंदविला. याप्रसंगी सहभागी विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा व वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली. विद्यार्थ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचे फायदे, तोटे व भविष्यातील आव्हाने याविषयी आपले मत व्यक्त केले. कार्यक्रमास ज्ञानोपासक शिक्षण मंडळी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री. गणेश चव्हाण प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रास्ताविकात शिंदखेडा तालुका विज्ञान संघाचे अध्यक्ष श्री. आर. ए. चित्ते यांनी तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघाचे कार्य विशद केले. कार्यक्रमास शिंदखेडा तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस. ए. कदम,
तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव एम. डी. पाटील, शिंदखेडा तालुका विज्ञान संघाचे अध्यक्ष श्री. आर. ए. चित्ते, तालुका विज्ञान संघाचे उपाध्यक्ष श्री. ए. टी. पाटील, तालुका विज्ञान संघाचे सचिव एस. एन. माळी, तालुका विज्ञान संघाचे कार्याध्यक्ष श्री. जे. डी. भदाणे, प्राचार्य डॉ. बी. बी. पाटील, उपमुख्याध्यापक सी. एस. पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे समन्वयक प्रा. डी. एम. चौधरी, पर्यवेक्षक बी. एच. पाटील, के. एच. वाडीले, विज्ञान विषय शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या विज्ञान मेळाव्यात प्रथम क्रमांक विश्वेश दिनानाथ पाटील (श्रीमती गो. स. देवकर माध्यमिक विद्यालय, विरदेल), द्वितीय क्रमांक कु. वैष्णवी प्रशांत जाधव (जनता हायस्कूल, शिंदखेडा ) व
तृतीय क्रमांक कु. लावण्या मिलिंद पाटील (भागवत माध्यमिक विद्यालय, पाष्टे) यांनी पटकावला. स्पर्धेत विजयी झालेल्या प्रथम तीन स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी, प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. परीक्षक म्हणून एन. एन. पाटील, श्रीमती एल. ए. राजपूत यांनी काम पाहिले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्रीमती एस. एम. साळुंखे, श्रीमती कविता पाटील, श्रीमती एस. एस. कागणे, आर. एन. सोनवणे, एन. एन. पाटील, एस. पी. बडगुजर, एस. ए. पाटील, एम. एम. महाजन, हेमंत पाटील, राकेश खैरनार, भटू मालचे, दिलीप पाटील, शिवा ठाकरे, विवेक पाटणकर, भिला पाटील, सतीश कोळी, सुनील पाटील यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन श्री. रमाकांत चव्हाण व श्री. एस एन. माळी सरांनी केले. श्री. ए. टी. पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!