शेवाडे :-राष्ट्रीय कार्यासाठी दोघ बंधुनी ठेवला गावापुढे आदर्श,,,,,,,,
शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील पोलीस पाटील युवराज माळी यांचा काका दीलीप भिका माळी वय 49 हे कामानिमित्त शेवाडे येथे स्थायिक झाले होते दोन मुले हरीश व राज पत्नी एक भाऊ भावजाई असा परिवार कामानिमित्त शेवाडे येथे आपल्या वडिलांपासून स्थायिक होता दिनांक 19 मे रोजी दिलीप भिका माळी यांचे अल्पशा आजाराने 19 मे रोजी निधन झाले घरातील कर्ता पुरुष दगावल्याने संपूर्ण कुटुंब दुःखात असताना प्रशासन प्रशासना तर्फे मतदानाच्या टक्का वाढावा यासाठी सर्व तरी प्रयत्न करण्यात येत आहे यासाठी घरोघरी गृहभेटी घेऊन मतदान वाढीसाठी प्रयत्न करण्यात येत असल्याने सकाळी लोकसभेची निवडणूक असल्याकारणाने मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असून चला मतदान करू या देशाची पंगती घडवु या मतदानाचा अभिमान लोकशाही आहे शान या म्हनी प्रमाणे भडणे येथील पोलीस पाटील युवराज माळी यांनी मतदान विषयी आव्हान केले आपल्या कुटुंबालाही मतदान करावे असे आवाहन केले माळी परिवारात घरात दुःख असताना लोकशाहीत मतदानाला खूप महत्त्व आहे आपले एक मतदान देशाचे भवितव्य घडवू शकते या उद्देशाने वडीलाचे दुःख बाजूला ठेवून माळी परिवाराने मतदान करून एक समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे
मतदान करणे आपला अधिकार असून ते एक राष्ट्रिय कर्तव्य आहे घरात वडीलाचे दुःख असले तरी एक देश सेवा ,आपला अधिकार व आपले जबाबदारी समजून या राष्ट्रीय कार्यासाठी आमच्या परिवाराने मतदान केले.
राज माळी मुलगा….