spot_img
spot_img

ग्रामीण पत्रकारितेला मुंबईत मानाचा मुजरा! महेंद्रसिंग गिरासे यांचा ‘पॉझिटिव्ह जर्नालिझम’ सन्मानाने गौरव,

ग्रामीण पत्रकारितेला मुंबईत मानाचा मुजरा!

महेंद्रसिंग गिरासे यांचा ‘पॉझिटिव्ह जर्नालिझम’ सन्मानाने गौरव,,,,

,,

बातमी संकलन – भूषण पवार 

मुंबई : ग्रामीण भागातील सकारात्मक आणि निर्भीड पत्रकारितेला अखेर मोठ्या व्यासपीठावर योग्य तो मान मिळाल्याचे चित्र मुंबईत पाहायला मिळाले. व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने आयोजित *“पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”* या भव्य सोहळ्यात शिंदखेडा तालुक्यातील पत्रकार (संपादक,साप्ताहिक बातमी वेध)महेंद्रसिंग गिरासे यांचा सन्मान करण्यात आला.

मुंबईतील वाय.बी.चव्हाण सेंटर येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाने केवळ पुरस्कार वितरण न करता पत्रकारितेच्या सकारात्मक विचारांना नवी दिशा दिली. ग्रामीण भागातून येत समाजातील प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या गिरासे यांच्या कार्याचा गौरव होताच, त्यांच्या लेखणीतील धार आणि सामाजिक बांधिलकीलाही मोठी दाद मिळाली.

महेंद्रसिंग गिरासे यांना सामाजिक कार्याची प्रेरणा घरातूनच मिळाली आहे. त्यांचे वडील ह.भ.प.श्री. कोमलसिंग गिरासे हे कान्हादेश वारकरी सेवा मंडळ,धुळे जिल्ह्याचे संघटक असून वारकरी सेवेद्वारे समाजात जनजागृती करणे आणि योग्य दिशा देणे हा त्यांचा मुख्य उद्देश आहे.आई अरुणाबाई गिरासे या अलाने गावाच्या बिनविरोध मा.सरपंच म्हणून गावविकासासाठी त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.लहान भाऊ संदीप गिरासे हा समाजसेवेत सक्रिय असून ऑनलाइन कामाच्या माध्यमातून लोकांची प्रश्न सोडविण्याचे कार्य करत आहे.कुटुंबातील या सामाजिक परंपरेतून प्रेरणा घेत महेंद्रसिंग यांनी पत्रकारितेत सकारात्मक वाटचाल करत आज मुंबईसारख्या महानगरात आपल्या गाव व तालुक्याचे नाव उंचावले आहे.

या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे व्हॉईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीपजी काळे यांचे नेतृत्व. त्यांनी व्यासपीठावर न जाता श्रोत्यांमध्ये बसून केलेले सूत्रसंचालन आणि कार्यक्रमाचे बारकाईने केलेले नियोजन उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरले.

कार्यक्रमादरम्यान संदीप काळे यांच्या पुस्तकांचे प्रकाशन, पत्रकारांसाठी विमा कवच उपक्रमाची घोषणा तसेच शेतकऱ्यांवरील गीताचे अनावरण करण्यात आले. यासोबतच सादर करण्यात आलेले व्हॉईस ऑफ मीडियाचे गीत उपस्थितांच्या मनाला भिडणारे ठरले.

याचवेळी राज्याध्यक्ष अनिल म्हस्के यांच्यावर देशपातळीवरील महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आल्याची घोषणा करण्यात आली.

पुरस्कारानंतर बोलताना महेंद्रसिंग गिरासे यांनी, “हा सन्मान केवळ माझा नसून ग्रामीण पत्रकारितेच्या प्रामाणिक लढ्याचा आणि सकारात्मक विचारांचा आहे,” असे सांगत व्हॉईस ऑफ मीडिया परिवाराचे आभार मानले.

उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष कल्पेश महाले, संयोजक गोरक्षनाथ मदने, धुळे जिल्हाध्यक्ष भूषण अहिरे,तालुका अध्यक्ष प्रदीप दिक्षित तसेच कार्याध्यक्ष भालचंद्र पाटील,सचिव भूषण पवार आणि शिंदखेडा तालुका टीमच्या मार्गदर्शनामुळेच हा सन्मान मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

एका सर्वसामान्य कुटुंबातून येत केवळ लेखणीच्या बळावर मुंबईत सन्मान मिळवणाऱ्या गिरासे यांच्या यशामुळे ग्रामीण भागातील पत्रकारांसाठी नवी प्रेरणा निर्माण झाली आहे.

सकारात्मक पत्रकारितेचा हा प्रवास आता अधिक जोमाने सुरू राहणार,अशीच अपेक्षा व्यक्त होत आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!