
हेल्मेट सक्ती मोहिमेला यश; अपघातात प्राध्यापकाचा जीव वाचला – प्रशासनाचा संदेश प्रभावी
नंदुरबार :- जिल्हा पोलीस दलातर्फे व पोलीस अधीक्षक नंदुरबार यांचे मार्गदर्शनाखाली सध्या संपूर्ण नंदुरबार जिल्हाभरात हेल्मेट सक्तीची कारवाई करण्यात येत आहे
आणि त्याची प्रतीची आज महाविद्यालयाचे प्राध्यापक यांना आली असून त्यांचा यामुळे जीव वाचला आहे.
घटना अशी घडली की, दि.25/02/2026 रोजी सकाळी 10/00 वा.चे सुमारास कोरीट येथील ज्युनिअर कॉलेजला प्राध्यापक असलेले भरत चव्हाण हे त्यांचे मोटरसायकल MH 39 D 6916 हिचेवर कोरिट येथे नोकरीनिमित्त जात होते त्यावेळी त्यांनी हेल्मेट परिधान केले होते. समशेरपुर कारखान्यालगत पोचल्यानंतर त्यांच्या मागावून *एक आयशर मोठा ट्रक MH 18 BG 9358* आला व त्याने त्यांना उजव्या बाजूने जोरात धडक मारली त्याच त्यांचा वाहनावरील ताबा सुटला आणि ते रोडावर जाऊन खाली पडले त्यावेळी त्यांनी हेल्मेट घातले असल्यामुळे त्यांच्या डोक्याला कुठलीही दुखापत झाली नाही.
परंतु त्यांच्या डाव्या खांद्याला गंभीर दुखापत झाली असून त्याकरिता त्यांना उपचारासाठी स्मित हॉस्पिटल, नंदुरबार येथे दाखल करण्यात आले आहे.
सदर घटनेच्या अनुषंगाने नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथे BNS विविध कलमान्वये आयशर ट्रक चालक याचे विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून गुन्ह्याचा तपास सुरू आहे.
याबाबत अधिक माहिती घेतली असता असे दिसून येते की अपघातामध्ये मयत होण्याचे प्रमाण हे डोक्याला दुखापत झाल्याने जास्त आहे याकरिता नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे सर्व दुचाकी चालक यांना हेल्मेट सक्तीने वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.







