शिंदखेडा : जनता हायस्कूलमध्ये एस.एस.सी. परीक्षार्थ्यांची बैठक व्यवस्था जाहीर
प्रतिनिधी – भूषण पवार
शिंदखेडा : – महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या मार्च २०२६ च्या एस.एस.सी. परीक्षेसाठी शिंदखेडा केंद्र क्र. १५५ अंतर्गत विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था जाहीर करण्यात आली आहे.
केंद्रातील परीक्षा क्रमांक D122067 ते D122381 पर्यंतच्या नियमित विद्यार्थ्यांची परीक्षा जनता हायस्कूल, कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, शिंदखेडा येथे होणार आहे. परीक्षा शुक्रवार, दि. २० फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होऊन बुधवार, दि. १८ मार्च २०२६ पर्यंत चालणार आहे.
या केंद्रावर जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय शिंदखेडा, न्यू माध्यमिक विद्यालय होळ, जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय चिमठाणे तसेच आयडियल इंग्लिश स्कूल आदी शाळांमधील विद्यार्थ्यांचा सहभाग राहणार आहे.
केंद्र संचालक म्हणून श्री. एस. एस. पाटील (मुख्याध्यापक, जनता हायस्कूल शिंदखेडा) हे काम पाहत असून सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
परीक्षेची सर्व तयारी पूर्ण झाली असून विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह नियोजित वेळेत परीक्षा केंद्रावर हजर राहावे, असेही कळविण्यात आले आहे.







