spot_img
spot_img

दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवनाचे भूमिपूजन मा.पणन मंत्री यांच्या हस्ते

दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवनाचे भूमिपूजन मा.पणन मंत्री यांच्या हस्ते

दोंडाईचा : — दोंडाईचा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवनाच्या भव्य इमारतीसाठी आज विधीवत भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या शेतकरी भवनाचे भूमिपूजन जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच महाराष्ट्राचे पणन मंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. ₹१ कोटी ३१ लाखांच्या निधीतून साकार होणारे हे भवन अत्याधुनिक व सुविधायुक्त असणार आहे.
बाजार समितीत माल विक्रीसाठी येणाऱ्या शेतकरी बांधवांना सुरक्षित व सुसज्ज विश्रांतीची सोय उपलब्ध व्हावी या उद्देशाने या भवनाची उभारणी केली जात आहे. नव्या इमारतीत शेतकऱ्यांसाठी आरामदायी निवास व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छतागृहे, बैठक व्यवस्था आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यामुळे बाजार समितीच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठी भर पडणार आहे.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी शेतकरी भवन हे शेतकऱ्यांच्या सन्मानाचे प्रतीक ठरेल, तसेच बाजार समितीत येणाऱ्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
या प्रसंगी सभापती नारायण पाटील, उपनगराध्यक्ष विजय पाटील, चिरंजीवी चौधरी, छोटू सोनवणे, उपसभापती प्रा. रमेश खैरनार, विक्रम पाटील, जिजाबराव सोनवणे, दगेसिंग गिरासे, राहुल कवाड, निखिल जाधव, एकनाथ भील, शामकांत पवार, पी. एल. पवार, आत्माराम पाटील, किशोर रंगराव पाटील, रोशन टाटीया, मोतीलाल वाकडे, वैशाली पवार, पूजा खडसे, सहाय्यक निबंधक शिरगावे, मुकेश देवरे, दादाभाऊ सोनवणे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
सोहळ्याला शेतकरी व नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!