spot_img
spot_img

माहिती अधिकार कार्यकर्ता राम ठक्कर यांची महासंघाच्या नंदुरबार मुख्य संपर्कप्रमुखपदी निवड

माहिती अधिकार कार्यकर्ता राम ठक्कर यांची महासंघाच्या नंदुरबार मुख्य संपर्कप्रमुखपदी निवड

नंदुरबार  :— गेल्या पाच वर्षांपासून माहिती अधिकार कायद्याच्या माध्यमातून शासकीय कार्यालयांतील भ्रष्टाचार, कामचुकारपणा व अनियमितता उघडकीस आणत सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने कार्यरत असलेले माहिती अधिकार कार्यकर्ता राम ठक्कर यांची माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या नंदुरबार मुख्य संपर्कप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे.

राम ठक्कर यांनी आतापर्यंत विविध शासकीय कार्यालयांविरोधात माहिती अधिकार अर्ज, निवेदने व पाठपुरावा करून अनेक प्रकरणे जनतेसमोर आणली आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत महासंघाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.

या निवडीबद्दल माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे अध्यक्ष माननीय बसवेश्वर साहेब यांनी राम ठक्कर यांचे अभिनंदन केले असून, भविष्यात संघटनेच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे जनहिताचे कार्य होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

निवडीबाबत प्रतिक्रिया देताना राम ठक्कर यांनी सांगितले की, “महासंघाने माझ्यावर दाखवलेला विश्वास हा माझ्यासाठी सन्मानास्पद आहे. मला देण्यात आलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून संघटना अधिक मजबूत करण्यासाठी तसेच गोरगरीब व सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी मी सदैव तत्पर राहीन.

या निवडीमुळे नंदुरबार जिल्ह्यात माहिती अधिकार चळवळीला अधिक बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!