साई धारा NX ला आंतरराष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार
अहमदाबाद येथे सन्मान; रकुल प्रीत सिंह यांच्या हस्ते गौरव
अहमदाबाद : टेक्सटाईल उद्योगातील दर्जा, नावीन्यपूर्णता आणि सातत्यपूर्ण गुणवत्तेची ठळक ओळख निर्माण करणाऱ्या सुरत येथील साई धारा NX या नामांकित टेक्सटाईल ब्रँडला आंतरराष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार (International Excellence Award) देऊन गौरविण्यात आले. अहमदाबाद येथे झालेल्या भव्य समारंभात सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
साई धारा NX चे संस्थापक व संचालक श्री. जयपालसिंग गिरासे यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने दर्जेदार कापडनिर्मिती, आधुनिक डिझाईन आणि ग्राहक-केंद्रित कार्यपद्धतीच्या बळावर अल्पावधीतच टेक्सटाईल क्षेत्रात विश्वासार्ह स्थान मिळविले आहे. सुरतसह देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ब्रँडने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
पुरस्कार स्वीकारताना श्री. जयपालसिंग गिरासे म्हणाले, “हा सन्मान आमच्या संपूर्ण टीमच्या मेहनतीचा, व्यावसायिक सहकाऱ्यांच्या पाठिंब्याचा आणि ग्राहकांनी दाखविलेल्या विश्वासाचा परिणाम आहे. आगामी काळातही गुणवत्ता व नावीन्य यांचा समतोल राखत जागतिक स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करण्याचा आमचा निर्धार आहे.”
हा पुरस्कार केवळ साई धारा NX साठीच नव्हे, तर सुरतच्या समृद्ध टेक्सटाईल उद्योगासाठीही अभिमानास्पद मानला जात आहे. टेक्सटाईल क्षेत्रातील नव्या यशोगाथेत साई धारा NX ने महत्त्वपूर्ण टप्पा गाठल्याची भावना उद्योगविश्वातून व्यक्त होत आहे.







