सोनगीर महाविद्यालयाच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचा समारोप संपन्न..
सोनगीर :- येथील बहुजन समाज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महा विद्यालय यांचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचा समारोप बाभळे ता.शिंदखेडा येथे समारोप करण्यात आला.
शिबिराचे उद्घाटन रिटायर्ड नायब सुभेदार श्री.ज्ञानेश्वर दिलीप अहिरराव यांच्या हस्ते करण्यात आले होते. तर प्रमुख वक्ते कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव चे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ.शिवाजीराव पाटील उपस्थित होते.
दिनांक १५जानेवारी ते २१ जानेवारी २०२६ या कालावधी सात दिवसीय शिबिराचा समारोप प्रसंगी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,जळगाव चे माजी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ.नितीन बारी यांच्या हस्ते करण्यात आला. प्रसंगी अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.आर.जी.खैरनार उपस्थित होते.तसेच उपाध्यक्ष श्री.दंगल वामन धनगर,संस्थेचे संचालक श्री.जी.के.तांबट,श्री. मुरलीधर मांगा चौधरी,श्री. गौरव कासार,श्री.लखन रुपनर,श्री.पंकज कदम, श्री.भटु राजे,श्री.एम.टी. गुजर,डॉ.गौरव पारेख, पत्रकार श्री.निखिल जैन, श्री.प्रवीण शिरसाठ आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
सदर शिबिर *शाश्वत विकासासाठी युवक पाणलोट व्यवस्थापन व पडीत जमीन विकास* या विषयाच्या अनुषंगाने शिबिरात स्वच्छ भारत अभियान,आरोग्य व्यवस्थापन,मतदार जनजागृती,पर्यावरण आदी विविध विषयाच्या अनुषंगाने विविध मान्यवर तज्ञांचे व्याख्यान झाले. तसेच सहभागी स्वयंसेवकांनी गावात विविध ठिकाणी स्वच्छता आणि आरोग्याची काळजी घेऊन जनजागरण केले.सदर शिबिरात१२५ विद्यार्थी सहभागी झाले होते.
सदर शिबिरात नियोजन अहवाल वाचन कार्यक्रमाधिकारी श्री.एस. आर.राणे यांनी केले.तसेच विद्यार्थ्यांनी शिबिरात आलेले अनुभव मनोगतातून व्यक्त केले.
*समारोपकर्ते डॉ.नितीन बारी* यांनी सांगितले की,राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात विविधांगी संस्कार नितीमूल्यांचे शिक्षण हे आपल्या भविष्य काळासाठी संस्कारमय असते.म्हणून स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात व भविष्यात राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचा नेहमी अवलंब करावा.असे सांगितले.
*कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी प्राचार्य डॉ.आर.जी. खैरनार* यांनी सदर शिबिराच्या आयोजनाचे कौतुक केले.आणि विद्यार्थ्यांनी शिबिराच्या अनुभवाचे भविष्यकालीन सामाजिक व शैक्षणिक प्रगतीत सामाजिक व राष्ट्रीयहित लक्षात घेऊन दूरदृष्टीसाठी अवलंब करावा.असे सांगितले.
प्रसंगी संस्थेचे संचालक श्री.जी.के
तांबट,श्री.दंगल वामन धनगर,श्री.मुरलीधर मंगा चौधरी यांनीही मनोगत व्यक्त केले.
शिबिराचे आयोजन व नियोजन कार्यक्रमाधिकारी डॉ.एस.आर.राणे,सह समन्वयक डॉ.डी.आर. पाटील व महिला कार्यक्रमाधिकारी श्रीमती डॉ.पी.डी.पाटोळे
यांनी केले.
शिबिर यशस्वीतेसाठी अधीक्षक तथा संचालक श्री.संदीप अमृतराव कासार,उपप्राचार्यडॉ.एन. एस.सोनवणे,डॉ.आर.के. जाधव,
डॉ.एन.बी.सोनवणे, डॉ.आर.पी.नगराळे,डॉ. डॉ.एन.व्ही.पाटील यांनी विशेष सहकार्य केले.तसेच श्री.जयपाल गिरासे, कु.श्वेता गवळे यांनीही अहोरात्र विशेष परिश्रम घेतले.
तसेच महाविद्यालयाचे प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व माजी विद्यार्थी यांनी शिबीर यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
सदर शिबिराचे सूत्रसंचालन डॉ.डी.आर. पाटील यांनी केले. तर आभार प्रदर्शन डॉ.एस.आर राणे यांनी मानले.
——–+———







