spot_img
spot_img

🚨 निष्पाप जीवावर बेफिकीर वाहनचालकाचा घाला – शिंदखेड्यात तरुणी ठार

भगवा चौकात भीषण अपघातात तरुणी ठार

मालवाहतूक वाहनाची धडक; मद्यधुंद चालकाचा संशय

शिंदखेडा | : -शिंदखेडा शहरातील भगवा चौक परिसरात गुरुवारी (दि. २२) सायंकाळी घडलेल्या भीषण अपघातात २१ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने शहरासह भडणे परिसरात शोककळा पसरली आहे.
भडणे येथील प्रियंका रावसाहेब कोळी (वय २१) ही एस.एस.व्ही.पी.एस. महाविद्यालयात शिक्षण घेत असून ती गुरुवारी महाविद्यालयातून घरी परतत असताना भगवा चौकाजवळ न्यायालयाच्या बाजूस फिल्टर पाण्याचे जार वाहून नेणाऱ्या ‘छोटा हत्ती’ मालवाहतूक वाहनाने तिला जोरदार धडक दिली.
या धडकेत प्रियंकाच्या डोक्याला व चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली. स्थानिक नागरिकांनी तातडीने तिला शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने तिला रुग्णवाहिकेद्वारे धुळे येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले.
दरम्यान, अपघातास कारणीभूत ठरलेला चालक राहुल पाटील (रा. वरुळ) हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. ओव्हरटेक करताना वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत असून अपघातानंतर मालवाहतूक वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाले. या घटनेत चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे.
या दुर्दैवी घटनेनंतर नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत असून मद्यधुंद वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!