*चिमठाणे गावतील रस्त्याच्या नित्कृष्ठ दर्जाच्या तक्रारी नंतर बांधकाम विभागाला आली जाग महेंद्र पाटील ( सोनू फौजी )यांच्या मागणीला यश
चिमठाणे :- गावतील अनेक दिवसांपासून ह्या रस्त्याने चालताना पावसाळ्यात खुप कसरत करावी लागत होती तसेच गावकऱ्यांनी देखील महेंद्र पाटील यांना वेळोवेळी सांगितले की ह्या रस्त्याने दिवसेंदिवस खुप झिक उडते तसेच पावसाळ्यात पाण्याचे डबके साचतात व चालणं अवघड होते म्हणून नित्कृष्ठ दर्जाची कामाची तक्रार चिमठाणे गावाचे सामाजिक कार्यकर्ते महेंद्र गोकुळ पाटील उर्फ सोनू फौजी यांनी सदर बांधकाम विभाग तसेच धुळे जिल्हा पालकमंत्री आदरणीय जयकुमार रावल यांच्या कडे केली होती तसेच धुळे जिल्हा बांधकाम विभाग अधीक्षक यांच्याशी स्वतः लेखी तक्रार देखील केली होती गेल्या 2 महिन्यापासून महेंद्र पाटील यांनी बांधकाम विभाग यांना वेळोवेळी पत्रव्यवहार करून संपर्क करून चिमठाणे गावतील रस्त्याच्या कामाच्या बाबतीत माहिती दिली असता तसेच पालकमंत्री मा जयकुमार रावल यांच्या सुचने नुसार बांधकाम विभागाचे अधिकारी यांना सूचना दिल्या असत्या सदर रस्त्याच्या ठेकेदार व इंजिनिअर यांना देखील पत्र दिले होते त्या बद्दल बांधकाम विभाग ने दखल रस्त्याच्या कामाची पाहणी करून रस्त्याचे काम 8 दिवसात सुरू करू असे आश्वासन दिले होते तरी आज चिमठाणे गावच्या बँक ऑफ इंडिया पासून आंबेडकर चौक ते बुराई नदीच्या पूला पर्यत सदरचे काम हे करण्यात आले असून त्यामुळे चिमठाणे गावतील नागरिकांनी पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल याचे देखील मनापासून आभार मानले असून सामाजिक कार्यकर्ते महेंद्र पाटील यांच्या मागणीला देखील यश मिळाले असून त्याबद्दल गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे..








