spot_img
spot_img

 शेवाडे येथील अंगणवाडी रिक्त पद बाबत सखोल चौकशी करण्याची मागणी

  शेवाडे येथील अंगणवाडी रिक्त पद बाबत सखोल चौकशी करण्याची मागणी

सामाजिक कार्यकर्ते महेंद्र पाटील (सोनू फौजि) यांची थेट बाल कल्याण विभाग यांच्या कडे तक्रार.

 संबंधित अधिकारी म्हणतो 50 हजार रुपये द्या मग काम होईल?

चिमठाणे :- सन 2021 रोजी शिंदखेडा तालुक्यातील शेवाडे गावांत अंगणवाडी मध्ये रिक्त पद असल्याने शेवाडे गावातील महिला रूपाली संजय माळी यांनी महिला बालकल्याण विभाग यांच्या कडे अर्ज दाखल केला होता . सदर भरती बाबत सूचक अधिकारी म्हणून रवींद्र मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार असल्याचे उघड झाले असून 2021 या वर्षी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती परतु सदर पदभरती बाबत रवींद्र मराठे यांनी या महिलेला वेळोवेळी पैसेची मागणी करून एक प्रकारे टाळाटाळ करून 2021 पासून 2025 पर्यत कुठल्याही प्रकारची ऑडर दिली नाही तसेच रवींद्र मराठे हे शासकीय अधिकारी असून तरी तरी त्यांनी या महिलेला गेल्या 5 वर्षात अनेक वेळा पैसे मागणी करून एक प्रकारे फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली असून शिंदखेडा तालुक्यातील हे प्रकरण अजुन किती गावात  रॅकेट उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण आज फक्त शेवाडे गावच्या महिला यांनी सामाजिक कार्यकर्ते महेंद्र गोकुळ पाटील यांना ही बाब निदर्शनास आणून दिली त्या नंतर महेंद्र पाटील यांनी सविस्तर माहिती गोळा करून संबंधित अधिकारी यांना सूचना देखील दिली असता तरीही पैसे द्या काम होईल अश्या प्रकारे जर अधिकारी भाषा वापरत असेल तर शिंदखेडा तालुक्यात अधिकारी हे पैसे घेऊन काम करतात की असे काही नवल वाटायला नको कारण तसेच महेंद्र पाटील यांनी सांगितले की जर ह्या भरती प्रक्रिया मधील सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी हा निलंबित न झाल्यास सर्व प्रकारच्या गोष्टीचा पुरावा घेऊन थेट मंत्रालय मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या कडे तक्रार दाखल केली जाईल तसेच या प्रकरण मध्ये अजून असे किती महिलांना अडकविण्यात आले तसेच या मध्ये कोण कोणत्या अधिकारी चा समावेश आहे याची देखील चौकशी करण्यात यावी संबंधित अधिकारी यांनी किती महिलांना कडुन पैसे घेतले आहे त्या बाबत सदर खुलासा करण्यात यावा तसेच या अधिकारी वर कठोर कारवाई करण्याची मागणी महेंद्र पाटील समाजिक कार्यकर्ते यांनी केली आहे….

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!