spot_img
spot_img

शिंदखेडा नगरपंचायत मतदार याद्यामध्ये प्रचंड घोळ- हरकतींचा पाऊस पडूनही बदल झालाच नाही,याला जबाबदार कोण ?

शिंदखेडा नगरपंचायत मतदार याद्यामध्ये प्रचंड घोळ हरकत घेऊनही जैसेथे परिस्थिती
-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=
शिंदखेडा  :- शिदखेडा नगरपंचायत मतदार याद्यामध्ये प्रचंड घोळ असून हरकती घेऊनही जैसेथे परिस्थिती मतदारंमध्ये प्रचंड संताप जबाबदार नगरपंचायतच एकूण सतरा प्रभाग किंवा वार्ड द्वारे निवडणुका होणार असून नगरध्यक्षपद जनतेतून निवडले जाणार आहे सध्या भाजपाचा बोलबाला असल्याने अनेक इच्छुकणी भाजपात प्रवेश घेतला असल्याने प्रत्येकालाच निवडणूक लढावायची असल्याने पक्ष प्रमुखांची चंगलीच डोकेदुखी होणार आहे जे सततचे कार्यकर्ते आहेत त्यांना डावळले जाण्याची शक्यता आहे.

या रण धुमाळीत काही राजकीयनी आपणास सोईस्कर असणाऱ्या प्रभागात मुखाधिकारी व इतर अधिकाऱ्यांना हाताशी धरून आपली नावे इतरांत्र प्रभागात जोडून घेतल्याची चर्चा आहे कारण त्यांचे मतदानप्राशन निर्माण होण्याची शक्यता आहे
मतदार याद्यांमध्ये बदल करण्यासाठी ऑक्टोबर महिन्यात अंतिम तारीख देऊन हरकती मागवल्यात त्यानुसार नगरपंचायतीने पथके निर्माण करून हरकत असलेल्या मतदारांच्या घरी जाऊन चौकशी अथवा पंचनामे करून घेतले मात्र मतदार प्रभाग जो हवा त्यात नावे सहभागी झाली नाही त्यामुळे प्रचंड संताप व्यक्त झाला त्यामुळे मोठ्या प्रमाणावर घोळ झाला आहे मयतांची नावे शेकडोने आहेत वास्तविक नगरपंचायत अस्तित्वात आल्याने मयत व्यक्तीची नोंद नगरपंचायतीमध्ये कर्णे बंधनकारक आहे मयत व्यक्तीचा दाखला घेण्यासाठी असलेली फी देखील वसूल केली जाते असे असताना मतदार यादीमधून मयत व्यक्तींची नावे कमी झाली नाहीत म्हणजेच संबंधित कर्मचारी कुठल्याही प्रकारे दखल न घेता कामे आटोपतात शिंदखेडा नगरपंचायतीमध्ये सेवेत असणारे 70 टक्के कर्मचारी यांना काहीही समजत नाही अर्थात इंग्रजीमध्ये 19 असेल तर मराठी मध्ये त्याचा वेगळा अर्थ पकडला जातो . इंग्रजीमध्ये एक असेल आणि मराठी मध्ये नऊ असेल तर त्या नऊ आकड्याला मराठी मध्ये एक पकडला जातो अशामुळे मोठे घोळ निर्माण झाले आहेत अशा प्रकारे कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कार्यवाही होणे आवश्यक आहे अशी मागणी नगरपंचायतीमध्ये उपस्थित झालेल्या नागरिकांनी केली आहे नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी यांच्याबाबत दखल घेणे ही गरजेचे आहे कारण निवडणूक काळातही ते मुख्यालयाला राहात नाहीत तर नगरपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी हे देखील शुक्रवारपासून मुख्यालय सोडून निघून जातात तर ते सोमवार किंवा मंगळवारी कार्यालयात हजर होतात काही अडचण निर्माण झाल्यास फोनही उचलत नाहीत त्यामुळे अनंत प्रश्न निर्माण होतात जिल्ह्यामध्ये पालकमंत्री आहेत त्यांचा शिंदखेडा शहरांमध्ये मोठा गवगवा आहे असे असतानाही शिंदखेडा नगरपंचायतीचे अधिकारी प्रशासकीय अधिकारी इतर सर्व कर्मचारी मात्र आपल्या कार्यामध्ये कसुरी करतात याबाबत जिल्हाधिकारी धुळे तहसीलदार सिंदखेडा यासह निवडणुकीत सहभागी सर्व अधिकाऱ्यांनी याची नोंद घ्यावी अशी ही मागणी जनतेमधून होत आहे
मतदारांनी हरकती घेऊन देखील कुठल्याही प्रकारची दखल न घेता जैसे थे परिस्थिती निर्माण झाली आहे मतदारांच्या याद्या संबंधित अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध केल्या वास्तविक अशा प्रकारच्या याद्या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध करू नये असा उच्च न्यायालयाचा दंडक असतानाही या निर्भवलेल्या अधिकाऱ्यांनी सोशल मीडियाचा आधार घेतला आणि शनिवार सुट्टी रविवार सुट्टी याचा लाभ घेत मुख्यालय सोडून गावी निघून गेलेत याबाबत जिल्हाधिकारी निवडणूक विभाग धुळे यांनी दखल घेणे गरजेचे आहे येत्या दोन दिवसात निवडणूक कार्यक्रम जाहीर होत असल्याचे समजते याची देखील दखल वरिष्ठांनी घ्यावी हरकत घेऊन देखील मतदारांचे नाव पंचनामा करूनही आपल्या प्रभागात आले नाही यास जबाबदार असलेल्या नगरपंचायतीतील सर्व अधिकारी उपाधिकारी कर्मचारी यांना जबाबदार धरून कार्यवाही करावी अशी मागणी शिंदखेडा शहरातील किमान 1000 मतदारांनी सोबत पत्रकारांनी केली आहे

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!