चिमठाणे गावातील माजी सैनिक श्री महेंद्र पाटील उर्फ सोनु फौजी यांच्या मार्फत आरोग्य शिबीर संपन्न
200 नागरिकांनी घेतला डोळे तपासणी शिबिराचा लाभ
चिमठाणे प्रतिनिधी – अविनाश वाडीले
चिमठाणे :- चिमठाणे
गावात महेंद्र गोकूळ पाटील उर्फ सोनू फौजी हे देशसेवा करून निवृत्त झाल्या बद्दल चिमठाणे गटाच्या नागरिकांसाठी महेंद्र पाटील यांनी आपण देशसेवा करून आलो तरी आता गोरगरीब जनतेची देखील सेवा करणे आपले कर्तव्ये असून आपण समाजच काही तरी घेणं लागतो विविध सामाजिक मूल्याचा विचार करून एक चिमठाणे गावात आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित करून चिमठाणे गावचे महेंद्र गोकूळ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शारदा नेत्रालय धुळे यांच्या माध्यमातून मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तरी त्यात 100 ते 150 नागरिकांचे डोळे चेकअप करून शारदा नेत्रालय मध्ये फ्री मध्ये ऑपरेशन करण्यात येणार असल्याचे देखील सांगण्यात असून जवळपास 50 लोकांना या ठिकाणी शासकीय योजना मार्फत फ्री मध्ये ऑपरेशन करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे अनेक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला याठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष धुळे जिल्हा पालकमंत्री आदरणीय नामदार जयकुमार भाऊ रावल तसेच कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आदरणीय नारायण पाटील भाऊसाहेब कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती दोंडाईचा श्री दीपक बागल भाजपा तालुका अध्यक्ष मा.सभापती रणजित भाऊसाहेब गिरासे,माजी उपसभापती दरबारसिंग गिरासे, मा.जि.प.सदस्य खंडू वजी भिल, माजी उपसरपंच सुरतसिंग गिरासे, मा जि, प,सदस्य महेंद्र गिरासे भाजपचे युवा मोर्चाचे राहुल निकम, कोमल गिरासे(फौजी) देवेंद्र ठाकूर नितीन गिरासे ,महेंद्र पाटील सर,भटू धनगर सर ,मोनू पाटील,भटू गिरासे,प्रवीण भोई पत्रकार डॉ जितेंद्र पाटील डॉ वैभव राजपूत आदिल पिजार वहाब शेख अमोल खैरनार अमोल रनद्दीवे अभिषेक पाटील इ.तसेच गावातील नागरीक जेष्ठ मंडळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते..







