शिंदखेडा :- १ नोव्हेंबर: राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत तातडीने निर्णय घेण्यात यावा, या मागणीसाठी आज ग्रामपंचायत युनियनचे पदाधिकारी मंत्री मा. जयकुमार भाऊ रावल यांची भेट घेतली. या वेळी ४५ युनियनचे ११ पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढ, वेतनश्रेणी आणि थकीत मानधनाबाबत सविस्तर निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले की, ग्रामीण भागातील नागरिकांना पाणीपुरवठा, स्वच्छता, नाली सफाई, गाव विकास अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना अद्याप स्थायी वेतनश्रेणी देण्यात आलेली नाही. अनेक वर्षे काम करूनही त्यांच्या सेवांचे नियमितीकरण झालेले नाही. महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाने २०१४ पासून या प्रश्नाबाबत शासनदरबारी पाठपुरावा सुरू ठेवला आहे. परंतु अद्याप ठोस निर्णय झाला नसल्याने कर्मचाऱ्यांत तीव्र असंतोष आहे.
मंत्री रावल यांना देण्यात आलेल्या निवेदनात कर्मचाऱ्यांचे वेतन ४० ते ७५ टक्क्यांनी वाढवावे, तसेच त्यांच्या वेतनश्रेणीतील तफावत दूर करून न्याय्य निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. राज्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये आर्थिक तुटवडा असल्यामुळे कर्मचाऱ्यांना मानधन वेळेवर मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या उपजीविकेवर परिणाम होत आहे.
या बैठकीत उपस्थित असलेले ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे अध्यक्ष महेश दादा कोळी यांनी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे सर्वांचा विश्वास संपादन केला आहे. त्यांनी केवळ आपला तालुका नव्हे तर संपूर्ण राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी आवाज उठवला आहे. गावोगावी जाऊन कर्मचाऱ्यांची व्यथा समजून घेऊन त्यांचे प्रश्न शासनापर्यंत पोहोचवणे, हे त्यांचे ध्येय बनले आहे.
युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “महेशदादा यांनी घेतलेला संकल्प म्हणजे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देणे. ते जिथे आवश्यक असेल तिथे स्वतः पोहोचून विषय मांडतात. कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी घेतलेली मेहनत प्रेरणादायी आहे.”
मंत्री जयकुमार रावल यांनी यावेळी कर्मचाऱ्यांचे निवेदन गांभीर्याने ऐकले असून मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत हा विषय मांडण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांनी संबंधित विभागांना या मागण्यांबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या या प्रश्नांवर शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा सर्व युनियन सदस्यांनी व्यक्त केली. बैठकीच्या शेवटी महेश दादा कोळी यांनी सर्व उपस्थितांना आभार मानून सांगितले की, “आपली एकता हीच आपली ताकद आहे. आपण एकत्र राहिलो, तर नक्कीच हक्क मिळवू.”
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या न्यायासाठी सुरू असलेला हा लढा आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे.
महेश कोळी जिल्हा सचिव व शिंदखेडा तालुका अध्यक्ष ग्रामपंचायत कर्मचारी युनियन संघटना एनजीपी 45 11 च्या वत







