spot_img
spot_img

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या उद्योग विभागाच्या राज्य चिटणीसपदी नरेश पवार यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या उद्योग विभागाच्या राज्य चिटणीसपदी नरेश पवार यांची नियुक्ती

नंदुरबार (प्रतिनिधी):

नंदुरबार:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) उद्योग व व्यापार विभागाच्या राज्य चिटणीसपदी नंदुरबारचे नरेश सुपडू पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नरेश पवार हे यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे भटके जाती-जमाती प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. पक्षवाढ आणि समाजकार्यासाठी त्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण योगदानाची दखल घेऊन त्यांना ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

पक्षाच्या नेतृत्वाने त्यांच्या कार्याचा गौरव करत, उद्योग व व्यापार विभागाच्या राज्य पातळीवरील चिटणीसपदी त्यांची नियुक्ती जाहीर केली. या नियुक्तीमुळे नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!